UP ATS Arrested Two Al Quida Terrorist From Kakori Found Pressure Cooker bomb

ATS ने अलकायदाचा कट हाणून पाडला, लखनऊसह अनेक जिल्ह्यांत साखळी स्फोट घडवण्यापूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक, जिवंत प्रेशर कुकर बॉम्बही जप्त

UP ATS Arrested Two Al Qaeda Terrorist : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील काकोरी येथे दहशतवाद विरोधी पथकाने अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये साखळी स्फोट घडवून आणण्याची त्यांची योजना होती. यूपी एटीएसने ताब्यात घेतलेल्या या दोन संशयितांजवळ प्रेशर कुकर बॉम्बही सापडला आहे. हा खूप वजनदार स्फोटक असून जिवंत बॉम्ब सापडला आहे. UP ATS Arrested Two Al Qaeda Terrorist From Kakori Found Pressure Cooker bomb


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील काकोरी येथे दहशतवाद विरोधी पथकाने अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये साखळी स्फोट घडवून आणण्याची त्यांची योजना होती. यूपी एटीएसने ताब्यात घेतलेल्या या दोन संशयितांजवळ प्रेशर कुकर बॉम्बही सापडला आहे. हा खूप वजनदार स्फोटक असून जिवंत बॉम्ब सापडला आहे.

यूपी एटीएसचे आयजी जीके गोस्वामी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश आणि लखनऊमध्ये साखळी स्फोटांचा त्यांचा कट होता. जिवंत बॉम्बही जप्त करण्यात आला आहे. संशयित दहशतवाद्यांचे काश्मीरशी संबंध आहेत. हे स्लीपर सेल्स होते, परंतु आता ते सक्रिय झाले होते. आज किंवा उद्या लखनऊ आणि उत्तर प्रदेशात स्फोट करण्याचा त्यांचा डाव होता. त्यांच्याकडून बरीच स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. एका मोठ्या कटाअंतर्गत हे स्फोट घडवणार होते. त्यांची यासाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. त्यांच्यासारखे आणखी इतरही लपलेले असू शकतात, यासाठी छापेमारी सुरू आहे.

अटक केलेल्या संशयितांपैकी एकाचे नाव शाहिद आहे. तो मलिहाबादचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. छापा टाकण्यात आलेले घर शाहिदचेच आहे, येथे तो आपल्या कुटुंबासह राहतो आणि मोटर गॅरेजचे काम करतो. या संशयितांचे काश्मीर कनेक्शनही समोर आले असून त्याचा तपास सुरू आहे. यूपी एसटीएसच्या मते बरेच जण या कटात गुंतलेले आहेत.

यूपी एटीएसने शाहिद, रियाज आणि सिराज यांच्या घरावर छापा टाकला आहे. शेजारच्या आलमच्या म्हणण्यानुसार त्याचे कुटुंब 12 वर्षांपासून येथे राहत आहे. रियाझ आणि सिराज सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असून शाहिद गॅरेज चालवितो. 9 वर्षांपूर्वी शाहिदही नोकरीसाठी दुबईला गेला होता. अटकेपूर्वी या दहशतवाद्यांनी काहीतरी जाळले होते असेही सांगितले जात आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारीही आता एटीएसच्या संपर्कात आहेत.

एटीएसला छोट्या स्फोटाचा मागमूस लागला. ओमर अल-मंडी या संशयितांचा कंट्रोलर होता. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरून हँडलिंग झाली होती. आणखी काही दहशतवादी घटनास्थळी लपून बसलेले असू शकतात. सर्च ऑपरेशन सुरू आहे.

UP ATS Arrested Two Al Qaeda Terrorist From Kakori Found Pressure Cooker bomb

महत्त्वाच्या बातम्या