दक्षिण कश्मीरच्या अनंतनागमध्ये NIAची छापेमारी, ISISशी संबंधांवरून 6 जणांना अटक

NIA Raids underway in jammu kashmir at multiple locations including anantnag

NIA Raids : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागसह अनेक ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून एनआयएने या छाप्यांदरम्यान पाच जणांना अटक केली आहे. अनंतनागमध्ये चार ठिकाणी आणि श्रीनगरमधील एका व्यक्तीला अटक केली. NIA Raids underway in jammu kashmir at multiple locations including anantnag


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागसह अनेक ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून एनआयएने या छाप्यांदरम्यान पाच जणांना अटक केली आहे. अनंतनागमध्ये चार ठिकाणी आणि श्रीनगरमधील एका व्यक्तीला अटक केली.

हे आरोपी अफगाणिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. दारुल उलूम इन्स्टिट्यूटवरही एआयएने छापे टाकले आहेत. लॅपटॉपसह अनेक कागदपत्रे तपास यंत्रणेने जप्त केली आहेत. याप्रकरणी दारुल उलूम संस्थेच्या अध्यक्षांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

एका दिवसापूर्वीच जम्मू-काश्मीर सरकारच्या 11 कर्मचार्‍यांना दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून काढून टाकण्यात आले होते. यात अनंतनाग जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा समावेश असून ते देशविरोधी कार्यात सहभागी असल्याचे आढळले. दहशतवाद्यांना अंतर्गत माहिती पुरविणाऱ्या दोन पोलीस हवालदारांचा यात समावेश आहे. शनिवारी नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या 11 सरकारी कर्मचार्‍यांपैकी चार अनंतनाग जिल्ह्यातील, तीन बुडगाममधील आणि बारामुल्ला, श्रीनगर, पुलवामा आणि कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्येकी एक आहेत.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर सेवा नियमन नियमावलीत दुरुस्ती केली होती आणि कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या नोकरीतून काढून टाकण्याची तरतूद केली होती. एखादा कर्मचारी देशविरोधी किंवा अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेला आढळला तर त्याला तातडीने बरखास्त करण्याची तरतूद आहे.

NIA Raids underway in jammu kashmir at multiple locations including anantnag

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात