
नाशिक : राम जन्मभूमी मंदिरासाठी जमीन खरेदीत कथित घोटाळा बाहेर काढण्यामागे उघडपणे चाली रचण्यापेक्षा मागून चाली रचणाऱ्यांचा “हात” मोठा आहे. हा कथित घोटाळा भले आम आदमी पक्षाच्या खासदार संजय सिंह यांनी बाहेर काढल्याचा दावा केला असेल, पण त्यामागचे “खेळणारे हात” अधिक मोठे आणि उत्तर प्रदेशात आपले राजकारण साधून घेण्यापेक्षा सत्ताधारी भाजपला राजकीय फाऊल करण्याचा डाव रचणारे आहेत.UP assembly election 2022; congress – SP combine trying to Divide hindus ; consolidate muslims and dalits aginst them
उत्तर प्रदेशात कितीही प्रयत्न केले तरी आपली सत्ता येणार नाही. आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही, हे समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला कळून चुकले आहे. आणि म्हणूनच हिंदू मतांमध्ये उभी फूट पाडण्याचा डाव रचण्यात येतोय, भाजपच्या अंतर्गत वर्तुळात या मुद्द्याची गंभीर चर्चा सुरू आहे. आणि त्यावर परिणामकारक तोडगा काढण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत.
- हिंदू पुर्नजागरणसाठी राजधानी दिल्लीचे इंद्रप्रस्थ असे नामकरण करा, डॉ. सुब्रमण्याम स्वामी यांची मागणी
Divide hindus ; consolidate muslims and dalits aginst them हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांचा मूळ डाव आहे. २०१४ मध्ये हिंदूंची एकजूट झाली आणि ती समाजवादी पक्ष, काँग्रेस यांना नडलीय. त्यांचे गेल्या कित्येक वर्षांचे राजकारण या हिंदूंच्या एकजूटीने धुवून काढले.
आपले राजकारण पुन्हा उभे करायचे असेल, तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला हिंदू मतांचे विभाजन करण्याखेरीज पर्याय नाही. म्हणजे त्यांना हिंदू समाजात फूट पाडण्याची खेळी करण्यावाचून पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे.
यातूनच राम जन्मभूमी मंदिरासाठी जमीन खरेदीत कथित घोटाळा झाल्याचा मुद्दा उचलण्यात आला आहे. पण हा एकमेव आणि अंतिम मुद्दा नाही. या मागची गेल्या दोन वर्षांमधली क्रोनॉलॉजी पाहिली तर हेच सांगते.
अगदी हाथरस प्रकरणात हिंदू समाजात फूट पाडण्याचा डाव पध्दतशीरपणे खेळला गेला. ज्या भीम आर्मी नावाच्या संघटनेचे अस्तित्व नावापुरते आहे, त्याला अतोनात महत्त्व देऊन जणू ती संघटना उत्तर प्रदेशातील दलितांचे प्रतिनिधीत्व करते, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला.
त्या प्रयत्नापासून ते काल – परवाच्या वृध्द मुस्लीमाच्या दाढी कापण्याच्या प्रसंगापर्यंत हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी विशिष्ट नॅरेटिव्ह सेट करण्याचाच प्रयत्न यातून दिसला. Political issues च्या पलिकडे जाऊन या खेळी रचण्याचा प्रयत्न झाला. पण यामध्ये काँग्रेस नेतृत्वाला आणि समाजवादी नेतृत्वाला मर्यादेपलिकडे यश मिळालेले दिसत नाही.
त्यामुळे हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी ब्राह्मण समाजाला भाजपपासून दूर करण्याचे आणि दलित समाजाला मायावतींपासून दूर करण्याचे मनसूबे रचले जात आहेत. भीम आर्मीच्या रावण नावाच्या नेतृत्वाला हवा देण्यामागे हेच मुख्य कारण आहे.
यातून दलित मतांमध्ये फूट पाडण्याचा, हिंदू मतांमध्ये फूट पाडण्याचा आणि मुस्लीमांचे मात्र एकजूटीने स्ट्रॅटेजिक मतदान हा डाव उत्तर प्रदेशात आत्तापासून रचला जातोय. अर्थात तो जशाच्या तसा यशस्वीच होईल अशी शक्यता नाही. कारण त्यालाही काटशह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यामध्ये भाजप आणि मायावती यांच्यात “अंतर्गत समझोता” होऊ शकतो, असे बोलले जात आहे. भाजपने आपली आणि मायावतींनी आपली वोट बँक टिकवून ठेवण्यासाठी हा “आतून केलेली हातमिळवणी” उपयोगी ठरू शकतो, अशी चर्चा आहे.
यातून १५ ते २० टक्क्यांच्या मतांच्या फरकाचा जो खेळ समाजवादी पक्ष आणि काँग्रेस करू इच्छितात, तो त्यांच्यावरच उलटून उत्तर प्रदेशात भाजप आणि मायावतींचे नवे political combination तयार होऊ शकते, अशी चर्चा आहे.
यामुळे भाजप हिंदू मतांमधील फूट भरून काढू शकेल आणि मायावती दलित मतांमधील फूट भरून काढून आपले गमावलेले स्थान परत मिळवू शकतात, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी त्याची अद्याप पुष्टी केलेली नाही, तरी त्याचा इन्कार देखील केलेला नाही. त्यामुळे या दाव्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे.
UP assembly election 2022; congress – SP combine trying to Divide hindus ; consolidate muslims and dalits aginst them
Array