प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी स्वत:च्या हातांनी फावड्याने शेणाचा ढीग साफ केला. स्मृती इराणींना मैदानावरील शेण हटवताना पाहून उपस्थित भाजप नेतेही कामाला लागले. यामुळे सुमारे 30 मिनिटांत एक ट्रॉली शेणाचा ढीग साफ झाला. या कामामुळे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.Union Minister Smriti Irani cleans shovels in old woman’s request to clear ground for daughter’s wedding
आज दिनांक 07/06/2022 को भीम नगर सुअर बड़वा में केंद्रीय मंत्री श्रीमती @smritiirani जी के नेतृत्व में उनके साथ स्वच्छता अभियान के कार्यक्रम में जिलाध्यक्ष व अन्य कार्यकर्ता सम्मिलित हुए। pic.twitter.com/2qTCpbZBnM — Arbind pandey avinash(मोदी का परिवार) (@Arbindp1) June 7, 2022
आज दिनांक 07/06/2022 को भीम नगर सुअर बड़वा में केंद्रीय मंत्री श्रीमती @smritiirani जी के नेतृत्व में उनके साथ स्वच्छता अभियान के कार्यक्रम में जिलाध्यक्ष व अन्य कार्यकर्ता सम्मिलित हुए। pic.twitter.com/2qTCpbZBnM
— Arbind pandey avinash(मोदी का परिवार) (@Arbindp1) June 7, 2022
वृद्ध महिलेने केली होती विनंती
स्मृती इराणी मंगळवारी भीम नगर सिग बरवा येथे स्वच्छता मोहिमेसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी परिसरातील एका वृद्ध महिलेने स्मृती इराणी यांना आपल्या मुलीचे घरासमोरील मैदानात लग्न लावणार असल्याचे सांगितले. काही गोपालकांनी त्या ठिकाणी शेणाचा ढीग जमा केला आहे. तो हटवावा, अशी विनंती केली होती.
स्मृती इराणी म्हणाल्या- चांगल्या कामात विलंब कसा?
वयोवृद्ध महिलेचे बोलणे ऐकून स्मृती इराणी म्हणाल्या की शुभ कार्यात विलंब कशाला? आम्ही मिळून शेणाचा ढीग हटवतो. यानंतर स्मृती इराणी यांनी स्वत: हातात फावडे घेतले आणि शेणाचा ढीग हटवायला लागल्या. त्यांना शेण हटवताना पाहून त्यांच्यासह उपस्थित भाजपचे नेते व कार्यकर्तेही पुढे आले. अनेक महिन्यांपासून साचलेला शेणाचा ढीग अवघ्या काही मिनिटांत साफ झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App