राज्यसभा निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला ठाकरे – पवारांचे निमंत्रण नाही!!


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकजुटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रयत्न करत असताना आमदारांची जादा मतांची गरज नसल्याचे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला ठाकरे – पवारांनी हॉटेल ट्रायडेंट मधल्या बैठकीला निमंत्रणच दिले नाही. Hitendra Thakur’s Bahujan Vikas Aghadi is not invited by Thackeray-Pawar

ठाकरे – पवारांनी हॉटेल ट्रायडंट मध्ये एक प्रकारे आपल्या आमदारांची ओळख परेड घेतली आहे कारण बैठकीला सोडताना प्रत्येक आमदाराला नाव पक्ष याची नोंदणी करावी लागत होती. समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना निमंत्रण होते. परंतु ते बैठकीला गेले नाहीत.



या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आमच्या पक्षाला महाविकास आघाडीने निमंत्रण दिले नाही आणि जिथे निमंत्रण नाही. तिथे आम्ही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे – पवारांना आपला जादाचा सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची गरज नाही असेच यातून दिसून येत आहे.

Hitendra Thakur’s Bahujan Vikas Aghadi is not invited by Thackeray-Pawar

हत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात