केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण, स्वत: ट्वीट करून दिली माहिती

Union Minister Prakash Javadekar Test Positive For Covid 19

Union Minister Prakash Javadekar : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले. मागच्या दोन-तीन दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. Union Minister Prakash Javadekar Test Positive For Covid 19


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले. मागच्या दोन-तीन दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रकाश जावडेकर हे पर्यावरण, वन आणि हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम अशा महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी एका ट्विटद्वारे स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “आज मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. गेल्या दोन-तीन दिवसांत जे माझ्या संपर्कात आले आहेत, कृपया त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी.”

योगी आणि येदियुरप्पांनाही संसर्ग

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनाही नुकतीच कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने आता रौद्ररूप धारण करायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे आता दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने महामारीच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या उत्पादनात वाढ, राज्यांना पुरेपूर ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याचबरोबर देशभरात लसीकरणही जोरदार सुरू आहे. सध्या 45 वर्षे वयापुढील सर्वांना ही लस उपलब्ध आहे. लवकरच इतर वयोगटांनाही लस खुली करण्यासाठी सरकारने प्रयत्न चालवले आहेत.

Union Minister Prakash Javadekar Test Positive For Covid 19

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात