Maharashtra Lockdown 2021 : राज्यात लॉकडाऊन पण रुग्णसंख्या वाढतीच, पहिल्यांदाच 24 तासांत 64 हजारांहून जास्त बाधितांची नोंद

Maharashtra Lockdown 2021 number of Corona patients rapidly increasing

Maharashtra Lockdown 2021 : महाराष्ट्रात देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. राज्य शासनाने आधी नाइट कर्फ्यू, नंतर शनिवार व रविवारचे वीकेंड लॉकडाउन आणि आता लॉकडाऊन लावूनही कोरोना रुग्णसंख्येत घट होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मागच्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे विक्रमी 63,729 रुग्ण आढळले आहेत, तर तब्बल 398 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून सर्वाधिक आहे. Maharashtra Lockdown 2021 number of Corona patients rapidly increasing


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. राज्य शासनाने आधी नाइट कर्फ्यू, नंतर शनिवार व रविवारचे वीकेंड लॉकडाउन आणि आता लॉकडाऊन लावूनही कोरोना रुग्णसंख्येत घट होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मागच्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे विक्रमी 63,729 रुग्ण आढळले आहेत, तर तब्बल 398 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून सर्वाधिक आहे.

शुक्रवारी राज्यात 63,729 रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यातील बाधितांचा एकूण आकडा हा 37,03,584 वर गेला आहे. तर मागच्या 24 तासांत 398 जणांच्या मृत्यूनंतर कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या वाढून 59,551 झाली आहे. यादरम्यान 45,335 जण बरेही झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 30,04,391 जण कोरोनातून बरे झालेले आहेत. सध्या 6,38,034 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे, आज मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याचे आढळले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या 24 तासांत 8839 जणांना संसर्ग झाला आणि 53 जण मरण पावले. आतापर्यंत मुंबईत एकूण 5,61,998 जणांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत एकूण 12,242 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4,63,344 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल आहेत. सध्या 85,226 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Maharashtra Lockdown 2021 number of Corona patients rapidly increasing

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात