CBSE नंतर आता ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षाही स्थगित, नव्या तारखांबाबत जूनमध्ये निर्णय

After CBSE, ICSE ISC Exams also cancelled

ICSE ISC Exams : कोरोना महामारीच्या देशात वाढलेल्या प्रादुर्भावामुळे कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच CISCEने आयसीएसई (इयत्ता 10वी) आणि आयएससी (इयत्ता 12वी) च्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. परीक्षांच्या नव्या तारखांबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. After CBSE, ICSE ISC Exams also cancelled


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या देशात वाढलेल्या प्रादुर्भावामुळे कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच CISCEने आयसीएसई (इयत्ता 10वी) आणि आयएससी (इयत्ता 12वी) च्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. परीक्षांच्या नव्या तारखांबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CBSEने नुकत्याच 10वीच्या परीक्षा रद्द करण्याबरोबरच 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. आता CISCE कडून ICSE (10वी) आणि ISC (12वी) च्या बोर्ड परीक्षां स्थगित करण्यात आल्या आहेत. CISCE चे मुख्य कार्यकारी आणि सचिव जी. एराथून यांनी याबाबत माहिती दिली आहे.

एका वृत्तानुसार, इयत्ता 12वीच्या परीक्षांबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा वैकल्पिक असेल. इयत्ता 10 वीचे जे विद्यार्थी परीक्षा देऊ इच्छित नाहीत, त्यांच्या निकालासाठी CISCE एक निश्चित मानदंड ठरवणार आहे.

After CBSE, ICSE ISC Exams also cancelled

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी