जुने वाहने स्क्रॅपमध्ये काढून नवीन वाहने खरेदीवर सरकारकडून करात सूट देण्याचा विचार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रतिपादन

Union Minister Nitin Gadkari Says Government can give more tax exemption on buying new vehicles by converting old vehicles into Scrap

Union Minister Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय वाहन स्क्रॅप धोरणांतर्गत जुन्या वाहनांचे भंगारात रूपांतर केल्यानंतर खरेदी केलेल्या नवीन वाहनांवर अधिक कर-संबंधित सवलती देण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. नवीन स्क्रॅप पॉलिसीमुळे प्रदूषण कमी होईल, असेही गडकरी म्हणाले. मारुती सुझुकी टोयोत्सूच्या स्क्रॅप आणि रिसायकलिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन करताना त्यांनी ही माहिती दिली. सरकारची मान्यता मिळालेले हे पहिलेच केंद्र आहे. Union Minister Nitin Gadkari Says Government can give more tax exemption on buying new vehicles by converting old vehicles into Scrap


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय वाहन स्क्रॅप धोरणांतर्गत जुन्या वाहनांचे भंगारात रूपांतर केल्यानंतर खरेदी केलेल्या नवीन वाहनांवर अधिक कर-संबंधित सवलती देण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. नवीन स्क्रॅप पॉलिसीमुळे प्रदूषण कमी होईल, असेही गडकरी म्हणाले. मारुती सुझुकी टोयोत्सूच्या स्क्रॅप आणि रिसायकलिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन करताना त्यांनी ही माहिती दिली. सरकारची मान्यता मिळालेले हे पहिलेच केंद्र आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले, “स्क्रॅप पॉलिसीमुळे केंद्र आणि राज्य दोघांच्याही वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसुलात वाढ होईल. याअंतर्गत करसंबंधित अधिकाधिक सवलती कशा देता येऊ शकतील याबद्दल मी वित्त मंत्रालयाशी चर्चा करेन.”

नवीन धोरणांतर्गत, केंद्राने सांगितले होते की राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश जुनी वाहने स्क्रॅपमध्ये बदलल्यानंतर नवीन वाहन खरेदीवर टोल टॅक्सवर 25 टक्क्यांपर्यंत सूट देतील. गडकरी म्हणाले की, नवीन धोरणांतर्गत आणखी कोणते प्रोत्साहन दिले जाऊ शकते याची शक्यता तपासण्यासाठी ते जीएसटी कौन्सिलला आग्रह करत आहेत.

ते म्हणाले, “यासंदर्भात अंतिम निर्णय अर्थ मंत्रालय आणि जीएसटी परिषद घेतील. स्क्रॅप पॉलिसीमुळे सर्वांचा लाभ होईल. कारण यामुळे निर्मितीला गती मिळेल, नोकऱ्यांची निर्मिती होईल आणि केंद्र व राज्ये दोघांनाही 40,000-40,000 कोटी रुपयांपर्यंतचा महसूल प्राप्त होईल.

प्रदूषणाला आळा घालण्याच्या आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून स्क्रॅप पॉलिसी महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. गडकरी म्हणाले, नवीन वाहनांपेक्षा जुनी वाहने जास्त प्रदूषण करतात. त्यामुळे ते काढण्याची गरज आहे. स्क्रॅप पॉलिसीमुळे विक्री 10 ते 12 टक्क्यांनी वाढेल अशी आमची अपेक्षा आहे.

Union Minister Nitin Gadkari Says Government can give more tax exemption on buying new vehicles by converting old vehicles into Scrap

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”