राहुल गांधींचा लखीमपूर दौरा म्हणजे राजकीय पर्यटन, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची टीका, म्हणाले- त्यांच्या मनात कोणतीही सहानुभूती नाही!


केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लखीमपूर खेरी दौरा हा ‘राजकीय पर्यटना’चे फक्त एक उदाहरण आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “राहुल गांधींची लखीमपूर खेरी यात्रा ही राजकीय पर्यटनाचे फक्त एक उदाहरण आहे. यात कोणतीही वास्तविक सहानुभूती आणि करुणा नाही. Union Minister Giriraj Singh Criticizes Rahul Gandhis Lakhimpur Kheri visit As political tourism


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लखीमपूर खेरी दौरा हा ‘राजकीय पर्यटना’चे फक्त एक उदाहरण आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “राहुल गांधींची लखीमपूर खेरी यात्रा ही राजकीय पर्यटनाचे फक्त एक उदाहरण आहे. यात कोणतीही वास्तविक सहानुभूती आणि करुणा नाही. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष त्यांचे राजकीय दौरे करतात. मला विचारायचे आहे की, राहुल गांधी त्या घटनेत ठार झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला भेटायला का गेले नाहीत? काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटायला ते का गेले नाहीत?”



3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मृत शेतकरी लव्हप्रीत सिंहच्या नातेवाईकांची भेट घेतली. आपल्या लखीमपूर भेटीशी संबंधित एक व्हिडिओ जारी करताना राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटले की, पीडितांना न्याय द्यावाच लागेल.”

12 तासांच्या चौकशीनंतर आशिष मिश्राला अटक

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी घटनास्थळी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. लखीमपूर खेरी हिंसाचारात आंदोलक शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर त्या दोन दिवस पोलीस कोठडीत होत्या. यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याविरोधात उसळलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. या प्रकरणात, उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या संदर्भात सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला शनिवारी अटक केली.

Union Minister Giriraj Singh Criticizes Rahul Gandhis Lakhimpur Kheri visit As political tourism

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात