WATCH : ना बडेजाव, ना मोठेपणाचा आव, केंद्रीय कायदा मंत्र्यांनी ग्रामस्थांसोबत लोकगीतांवर धरला ठेका, पीएम मोदींनीही केले कौतुक

Union Law Minister Kiren Rijiju seen performing traditional dance with villagers in Arunachal Pradesh

Union Law Minister Kiren Rijiju : केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशातील एका गावातील रहिवाशांसोबत पारंपरिक नृत्य केले. एका प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ते गेले होते. ईशान्येकडील या राज्यातील काजलंग गावातील स्थानिकांना मिझी असेही म्हटले जाते, त्यांनी त्यांच्या पारंपरिक गाण्याने आणि नृत्याने केंद्रीय मंत्र्याचे स्वागत केले. Union Law Minister Kiren Rijiju seen performing traditional dance with villagers in Arunachal Pradesh


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशातील एका गावातील रहिवाशांसोबत पारंपरिक नृत्य केले. एका प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ते गेले होते. ईशान्येकडील या राज्यातील काजलंग गावातील स्थानिकांना मिझी असेही म्हटले जाते, त्यांनी त्यांच्या पारंपरिक गाण्याने आणि नृत्याने केंद्रीय मंत्र्याचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा व्हिडिओ शेअर करून त्यांचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की “आमचे कायदे मंत्री किरेन रिजिजू हे एक उत्तम नर्तकही आहेत. अरुणाचल प्रदेशची चैतन्यशाली आणि गौरवशाली संस्कृती पाहून आनंद झाला.”

शर्ट, पायघोळ आणि स्नीकर्स घातलेले, रिजिजू गावकऱ्यांसोबत पारंपरिक नृत्याचा आनंद घेताना दिसले. झांज आणि ढोल-ताशांच्या गजरात मंत्र्यांनी पारंपारिक लोकगीतांवर ठेका धरला. यादरम्यान, स्थानिकही खूप आनंदी दिसून आले. रिजिजू यांनी लिहिले, “विवेकानंद केंद्र विद्यालय प्रकल्पांच्या देखरेखीसाठी सुंदर काजलंग गावाच्या माझ्या भेटीदरम्यान. जेव्हा जेव्हा पाहुणे त्यांच्या गावाला भेट देतात तेव्हा सोलंग लोकांसाठी हा पारंपारिक आनंद असतो. ओरिजनल लोकगीते आणि नृत्य हे अरुणाचल प्रदेशातील प्रत्येक समाजाचे सार आहेत.”

Union Law Minister Kiren Rijiju seen performing traditional dance with villagers in Arunachal Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात