
लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आशिष मिश्रा मोनूच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट लागू झाल्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी संतप्त झाले आहेत. हिंसाचार प्रकरणात मुलगा आशिष मिश्रा अडकल्यावरून पत्रकारांच्या प्रश्नावर चिडलेल्या अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त करत त्यांना शिवीगाळ केली. Union Home Minister Of state Ajay Mishra gets angry On Jourrnalists when he asks questions on Lakhimpur case
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आशिष मिश्रा मोनूच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट लागू झाल्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी संतप्त झाले आहेत. हिंसाचार प्रकरणात मुलगा आशिष मिश्रा अडकल्यावरून पत्रकारांच्या प्रश्नावर चिडलेल्या अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त करत त्यांना शिवीगाळ केली.
लखीमपूरमध्ये मदर चाइल्ड केअरच्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी आलेले केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मीडियावाल्यांनी, एका निष्पापाला अडकवले आहे. लाज वाटत नाही किती घाणेरडे लोक आहेत, दवाखाना आहे, सर्व काही आहे, ते दिसत नाही.’
मंत्री अजय मिश्रांकडून पत्रकारावर हात उचलण्याचा प्रयत्न
बुधवारी पत्रकारांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना एसआयटीच्या अहवालाबाबत विचारले असता ते संतापले. ते म्हणाले, ‘जा आणि एसआयटीला विचारा, हा तुमचा मीडिया आहे ना, यांनीच एका निरपराध माणसाला गोवले आहे, तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे… एसआयटीला विचारू नका…’
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनीही पत्रकारावर हात उगारण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे उभ्या असलेल्या लोकांनी त्यांना रोखले. यानंतर पुन्हा अजय मिश्रा यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली.
एसआयटी अहवालात ठपका
दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना हा सुनियोजित कट होता, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एसआयटीने आता आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांमध्येही बदल केला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर आता निर्दोष हत्येऐवजी खुनाचा खटला चालणार आहे.
नियोजित गुन्ह्याचा आरोप
लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्रासह 14 जणांवरील चौकशीनंतर कलमे बदलण्यात आली आहेत. जाणीवपूर्वक नियोजन करून हा गुन्हा केल्याचा आरोप सर्व आरोपींवर आहे. SIT ने IPC कलम 279, 338, 304A काढून टाकले आणि 307, 326, 302, 34,120 B, 147, 148,149, 3/25/30 लावले.
पत्रकारों पर भड़के गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी। लखीमपुर कांड को लेकर पूछे सवालों पर भड़के। लगता है पद जाने की आशंका की खबर लग गयी है. #lakhimpurkheri #AjayMishraTeni #UPElection #FarmersProtests pic.twitter.com/IAprZhaZ3h
— Dr. Sandeep Seth (@sandipseth) December 15, 2021
आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले
या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी यूपीमधील लखीमपूर खेरी येथील टिकुनिया येथे एका कार्यक्रमात कृषी कायद्यांचा निषेध करून परतत असताना चार शेतकरी SUV कारने चिरडले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी उपस्थित होते. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. या घटनेत स्थानिक पत्रकार रमन कश्यप यांचाही मृत्यू झाला होता. एसयूव्ही अजय मिश्रा टेनी यांची असून त्यात त्यांचा मुलगा आशिष मिश्रा असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी झाली. अनेक दिवसांच्या हिंसाचारानंतर आशिष मिश्रा ऊर्फ मोनूला अनेक तासांच्या चौकशीनंतर ९ ऑक्टोबरला अटक करण्यात आली.
Union Home Minister Of state Ajay Mishra gets angry On Jourrnalists when he asks questions on Lakhimpur case
महत्त्वाच्या बातम्या
- STORY BEHIND SAMNA EDITORIAL : आता शिवसेनेसाठी धर्म म्हणजे अफूची गोळी ….! भगव्या वस्त्रांवरही आक्षेप…म्हणे राहुल गांधी म्हणतात तेच खरे …
- हिंदू व्होट बँकेवरून चंद्रकांत दादा – संजय राऊतांमध्ये खेचाखेची; राष्ट्रवादी – काँग्रेसची घसराघसरी!!
- ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा’ ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला
- पुणे – बंगळूर महामार्गावर कराड नजीक कोयना पुलाला पडले भगदाड; दुरुस्तीच काम वेगाने
Array