गृहमंत्री – सहकारमंत्री अमित शहांची राष्ट्रपतींशी भेट; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात “धक्कादायक विधेयके” येण्याची सोशल मीडियात चर्चा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री आणि नव्याने सहकार खात्याचे जबाबदारी दिलेले नेते अमित शहा यांनी आज दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. एएनआय वृत्तसंस्थेने एवढ्या एकाच ओळीत या भेटीची बातमी दिली आहे.Union Home Minister Amit Shah meets President Ram Nath Kovind at Rashtrapati Bhavan

पण त्यावरूनच सोशल मीडियामध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होते आहे. या अधिवेशनात काही राजकीय धक्कादायक विधेयके येतील का… काही अतिमहत्त्वाचे निर्णय होतील का… याची ही चर्चा सुरू झाली आहे.



यामध्ये समान नागरी कायदा विधेयक, लोकसंख्या नियंत्रण विधेयक यांच्या सारखी धोरणात्मक विधेयके मोदी सरकार मांडणार आहे का, याची चर्चा करण्यात नेटिझन्स आघाडीवर आहेत.

कलम ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचे विधेयक मांडण्यापूर्वी देखील अमित शहांनी प्रथेप्रमाणे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. परंतु, त्याची बातमी आली नव्हती.

यावेळी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यास संपूर्ण आठवडा बाकी आहे. त्याआधीच अमित शहांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. अमित शहांकडे कालच गृहमंत्रीपदाबरोबरच नवे सहकार खातेही सोपविण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित काही सल्लामसलतीसाठी ते राष्ट्रपतींना भेटलेत का यावरही सोशल मीडियावर राजकीय तर्क लढविण्यात येत आहेत.

अमित शहांची ही राष्ट्रपतींशी झालेली ही सौजन्य भेट असली, तरी त्यामागे नक्की ठोस राजकीय कारण असणार याविषयी शंका असण्याचे कारण नाही. पण ते ठोस कारण कोणते, हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बाहेर येईल की त्याच्या आधीच बाहेर येईल, यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Union Home Minister Amit Shah meets President Ram Nath Kovind at Rashtrapati Bhavan

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात