सामान्य व्यक्ती बनून सफदरजंग रूग्णालयात गेले केंद्रीय आरोग्यमंत्री आणि…

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सफदरजंग हॉस्पिटल मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अचानकपणे पेशंट बनून भेट दिली. हॉस्पिटलमधील कारभाराचा त्यांना अनुभव आला आहे. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये जाऊन बाकावर बसले असता एका गार्डने त्यांना काठीचा प्रसाद दिला. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी हे सांगितले. हॉस्पिटल मधील भोंगळ कारभार त्यांच्या लक्षात आला. गुरूवारी हॉस्पिटलमध्ये चार नवीन सेवा सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री गेले असता त्यांनी ही गोष्ट तेथील डॉक्टरांनी सांगितली. ते म्हणाले की, हॉस्पिटलमधील सेवांमध्ये व कारभारामध्ये सुधारणा करून ते आदर्श हॉस्पिटल बनवावे.

Union Health Minister visits Safdarjung hospital disguised as a normal patient then…

मांडवीया हे सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन प्लांट तसेच कोरोना उपचारासाठीचे विभाग यासह चार नवीन सुविधांचा शुभारंभ करण्यासाठी गेले होते. यावेळी डॉक्टरांशी बोलताना त्यांनी आपला हा अनुभव सांगितला. ते म्हणाले, मी सामान्य पेशंट सारखा बाकावर बसलो असता गार्डने मला काठी मारली व म्हणाला इथे बसू नका. मंत्र्यांनी पाहिले की, एका पंचाहत्तरीतील वृद्ध महिलेसाठी तिच्या मुलाला स्ट्रेचर पाहिजे होते परंतु स्ट्रेचर मिळवण्यासाठी तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मदत केली नाही. ते म्हणाले की पेशंटना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था ठेवली गेली पाहिजे. या वृद्ध महिलेला हॉस्पिटलमध्ये पंधराशे गार्ड असुनही मदत मिळाली नाही. त्यांनी असेही सांगितले की इमर्जन्सी वॉर्डमध्ये पुरेश्या प्रमाणात सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे.


Mansukh Mandaviya Profile : कोण आहेत मनसुख मंडाविया, हर्षवर्धन यांच्या जागी बनले आरोग्यमंत्री, असा आहे राजकीय प्रवास


मंत्री म्हणाले की हा अनुभव पंतप्रधान मोदी यांना सांगितला. हे ऐकल्यानंतर ते म्हणाले की ज्यांनी तुम्हाला काठी मारली त्याला निलंबित केले आहे.

Union Health Minister visits Safdarjung hospital disguised as a normal patient then…

 

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात