Union Budget 2023 : संरक्षण क्षेत्रासाठी 13 % वाढीतून 5.94 लाख कोटींची तरतूद!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : लडाखसोबतच अरुणाचल प्रदेशातही चीनसोबतच्या सीमेचा वाद अनेक दिवसांपासून सुरु आहे. याचबरोबर पाकिस्तान काश्मीरमध्ये नापाक कारवाया करत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन, बुधवारी देशाच्या संरक्षण बजेटमध्ये 13 % वाढ करण्यात आली आहे. Union Budget 2023: Provision of 5.94 Lakh Crore for Defense Sector from 13% increase!!

त्याअंतर्गत संरक्षण क्षेत्रासाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 5.94 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात सरकारने नवीन शस्त्रास्त्रांची खरेदी, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा आणि आत्ननिर्भर भारत यावर मोठा भर दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीमेवर चीनसोबत तणावाचे वातावरण असतानाच सरकारने संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात ही वाढ केली आहे.

संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवणार

मागच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 5.25 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, परंतु ती आता 13 % वाढवण्यात आली आहे, जी 5.94 लाख कोटी रुपये आहे. ही रक्कम एकूण बजेटच्या 8 % आहे.

अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, बजेटचा मोठा भाग सैनिकांच्या पगार आणि पेन्शनवर खर्च होत असला तरी त्यामुळे लष्कराला हायटेक करण्यावरही भर दिला जाणार आहे. संरक्षण क्षेत्रात यंदाही देशाला स्वावलंबी बनवण्यावर सरकारचा भर आहे.

Union Budget 2023: Provision of 5.94 Lakh Crore for Defense Sector from 13% increase!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”