Uniform Civil Code : समान नागरी कायद्याबाबत मोदी सरकारची भूमिका संशयास्पद; सलमान खुर्शीदांचा आरोप


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : समान नागरी कायदा लागू करण्याची देशभर चर्चा सुरू आहे. परंतु याबाबत मोदी सरकारची भूमिका संशयास्पद आहे. समान नागरी कायद्याची ते जोपर्यंत नीट रूपरेषा सांगत नाहीत आणि व्याख्या करत नाहीत तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य नाही. पण कोणताही कायदा लागू करताना मोदी सरकार भेदभाव करते, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केला आहे.Uniform Civil Code: Modi government’s role in equal civil law is questionable; Salman Khurshid accused

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचे सूतोवाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी केल्यानंतर देशभरात समान नागरी कायद्या विषयी चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकार येत्या वर्षभरात समान नागरी कायदा विधेयक संसदेत जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खुर्शीद यांनी मोदी सरकारवर शरसंधान साधले आहे.



मोदी सरकार कोणताही कायदा लागू करताना भेदभाव करते. समान नागरी कायद्याची लेखी मोदी सरकारची व्याख्या स्पष्ट नाही. ते खुलेपणाने त्यावर काही बोलत नाहीत. समान नागरी कायदा लागू करताना हिंदू कोड लागू करणार का? हे त्यांनी सांगितले पाहिजे. हा कायदा फक्त मुस्लिमांसाठी लागू होईल का? या विषयी बोलले पाहिजे, असे प्रतिपादन सलमान खुर्शीद यांनी केले आहे.

काँग्रेसमध्ये गांधी परिवार केंद्रीभूत

त्याच वेळी सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसच्या भवितव्याविषयी देखील मत व्यक्त केले. काँग्रेसमध्ये गांधी परिवार केंद्रस्थानी आहे. काँग्रेसच्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी देखील ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. गांधी परिवाराचे केंद्रीभूत महत्व नाकारण्यात मतलब नाही. कारण काँग्रेसजनांना त्या परिवाराकडून नच काम करण्याची प्रेरणा मिळते, असे सलमान खुर्शीद म्हणाले.

 प्रशांत किशोरचा डाव

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरने काँग्रेससाठी काही संघटनात्मक सुधारणा सुचवल्या. त्यामध्ये गांधी परिवाराला पक्षसंघटनेतून बाजूला काढण्याचा त्याचा हेतू होता, असा संशय पक्षांमध्ये वाढल्याने त्याचा प्रवेश रोखण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खुर्शीद यांनी गांधी परिवाराला काँग्रेसमध्ये केंद्रीभूत स्थान आहे असे वक्तव्य करणे याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

Uniform Civil Code: Modi government’s role in equal civil law is questionable; Salman Khurshid accused

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात