युक्रेनचा रशियाला दणका; देशाचा युरोपीयन महासंघात प्रवेश; राष्ट्रपतींकडून करारावर स्वाक्षरी


वृत्तसंस्था

किव्ह : युक्रेनने युरोपीय देशांच्या संघात प्रवेश केला आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यात आणखी दरी निर्माण झाल्याने दोन्ही देशांत युद्ध आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली आहे. Ukraine hits Russia; Ukraine in the European Union; Signing of the agreement by the President

युरोपीय महासंघात युक्रेनने समाविष्ट होऊ नये, यासाठी रशियाने आक्रमक कारवाई करून युद्ध पुकारले आहे. दोन्ही देशात बेलारूस येथे शांती चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. परंतु या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांनी अचानक युरोपीय महासंघाचा सदस्य बनण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे रशिया आणखी खवळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे दोन्ही देशात बेलारुसमध्ये चर्चा सुरु असताना रशियाने हल्ले सुरूच ठेवले होते.आता युरोपियन संघाचा युक्रेन अधिकृत सदस्य बनल्याने त्याला मदत आणि शस्त्रपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून २७ देशांचा पाठींबा वाढल्याने रशियावर दबाव निर्माण होईल आणि तो आक्रमकता सोडून देईल, अशी आशा वाटत आहे. दुसरीकडे रशियाने आपली अण्वस्त्र सज्ज ठेवल्याने अण्वस्त्र हल्ल्याचा धोका वाढून जागतिक महायुद्धाला प्रारंभ होण्याची भीती व्यक्त केली आहे.

Ukraine hits Russia; Ukraine in the European Union; Signing of the agreement by the President

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण