वृत्तसंस्था
जम्मू : पाच दिवसांपासून पूँछ जिल्ह्यात भारतीय लष्कराची कारवाई सुरू असून केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. घनदाट जंगलात अतिरेकी लपल्यामुळे हेलिकाॅप्टर्सच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली आहे. या कारवाई वेळी चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले आहेत. Two soldiers Martyr in encounter in Kashmir, two militants killed दहशतवाद्यांवर उखळी तोफांचा मारा व रॉकेटस् डागले जात आहेत. पाच दिवसांत लष्कराचे ७ जवान हुतात्मा झाले, तर गुरुवारी रात्री रायफलमॅन
क्रमसिंह नेगी (२६) आणि रायफलमॅन योगंबर सिंह (२७, दोघेही रा. उत्तराखंड) यांना वीरमरण आले. जंगलांत दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कराने विशेष कमांडो व पॅरा कमांडो तैनात केले आहेत.लष्कराने राजौरी-पूँछ महामार्ग खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीस बंद केला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक (राजौरी-पूँछ रेंज) विवेक गुप्ता यांनी म्हणाले, दहशतवाद्यांच्या हालचालींवर आम्ही निर्बंध आणले आहेत. दहशतवाद्यांचा हा गट दोन-तीन महिन्यांपासून येथे लपून राहत होता.
घनदाट जंगल व डोंगराळ क्षेत्र असल्यामुळे कारवाईत खूप अडचणी येत आहेत. गुरुवारी रात्री जवान जंगलात दहशतवाद्यांना शोधत होते, तेव्हा झाडांमागे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात दोन रायफलमॅन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर घनदाट जंगलात लपलेल्या दोन दहशतवाद्यांना जवानांनी यमसदनी पाठविले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App