दोन मुलींचा एकाच मुलाशी विवाह करण्याचा हट्ट; कर्नाटकात ग्रामपंचायतीची पंचायत ; अखेर नाणेफेक करून फैसला


वृत्तसंस्था

हासन : कर्नाटकात दोन मुलींनी एकाच प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याची घटना घडली. परंतु प्रकरणाचा तिढा कसा सोडवायचा अशी पंचायत ग्रामपंचायतीची झाली. अखेर नाणेफेक करून फैसला करण्यावर एकमत झाले.Two girls urges to marry the same boy in Karnataka ; Gram Panchaya Finally decided by tossing a coin

एका चित्रपटात शोभेल, अशी ही घटना आहे. या लव्ह ट्रँगलची घटना हासन जिल्ह्यातील सकलेश्वर तालुक्यात घडली. याबाबतची माहिती अशी, सकलेश्वर गावातील एक २७ वर्षीय तरुण जवळच्या गावातील २० वर्षीय तरुणीला डेट करू लागला. त्यानंतर सहा महिन्यानंतर दुसऱ्या एका तरुणीला तो भेटला.



तेव्हा ते प्रेमात पडले.एकाच वेळी दोन्ही तरुणींना तो भेटू लागला. ही गोष्ट एका मुलीच्या नातेवाईकाने तिच्या वडिलांना सांगितली. तरुणाने प्रेमात पडलेल्या मुलीच्या वडिलांना लग्न करण्याची इच्छा प्रकट केली. पण, तशी परवानगी त्यांनी दिली नाही. त्यांनी मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्याचे ठरविले.

दरम्यान या प्रकरणातील दुसऱ्या मुलीने घरच्यांना आपले त्याच मुलाबरोबर प्रेम असल्याचे सांगितले. मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांना ही माहिती दिली.यानंतर पहिली मुलगा सुद्धा मुलाच्या घरी पालकांसह पोचली. त्यानंतर प्रकरण ग्रामपंचायतीकडे पोचले. दोन्ही मुलींनी लग्न करेन तर याच मुलाशी असा हट्ट धरला.

पहिल्या मुलीने विषप्राशन करीन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.अखेर पंचायत देईल, तो निर्णय मान्य करण्यावर दोन्ही बाजूकडून मान्य केले. नाणेफेक करून निर्णय घेण्यावर एकमत झाले. नाणेफेक जिंकणारीच मुलगीच लग्न करण्यास पात्र हा निर्णय झाला आहे.

पण, या प्रकरणाला दोन कंगोरे आहेत. पहिल्यात नाणेफेक जर आत्महत्या करणाऱ्या मुलीने जिंकली तर तरुण त्या मुलीशीच लग्न करेल. दुसरे असे तो तरुण पहिल्या मुलीशीच लग्न करण्याची इच्छा प्रकट करू शकतो. आता हेच दांपत्य विवाहबंधनात अडकल्याचे वृत्त आहे.

Two girls urges to marry the same boy in Karnataka ; Gram Panchaya Finally decided by tossing a coin

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात