सिंघू बॉर्डरवर दोन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू, भारतीय किसान यूनियनचे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन


कृषि कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे स्थळ असलेल्या दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन आंदोलक शेतकºयांचा मृत्यू झाल्याने भारतीय किसान यूनियनने आंदोलन स्थगित करण्याची मागणी केली आहे. यूनियनचे प्रवक्ते भोपाल सिंह यांनी ट्विटरवरून आंदोलन स्थगित करण्याचेआवाहन केले आहे.Two agitating farmers died on Singhu border, Bhartiy Kisan Union calls for suspension of agitation


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कृषि कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे स्थळ असलेल्या दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने भारतीय किसान यूनियनने आंदोलन स्थगित करण्याची मागणी केली आहे.

यूनियनचे प्रवक्ते भोपाल सिंह यांनी ट्विटरवरून आंदोलन स्थगित करण्याचेआवाहन केले आहे.कुंडली बॉर्डरवर सुरू असलेल्या आंदोलनातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पटियाला येथील शंकरपूर गावातील बलबीर सिंह यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.



त्याचबरोबर आंदोलनात ज्या गावातील शेतकरी सहभागी आहेत त्याठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याची मागणी जोर धरत आहे.

त्यामुळे आंदोलनात सहभागी असलेल्या भारतीय किसान यूनियन या प्रमुख संघटनेने आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. भोपाल सिंह यांनी म्हटले आहे की देशावर कोरोनाचे भयंकर संकट आले आहे. लोकांचे मृत्यू होत आहेत.

कुंडली सीमेवरही दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंदोलन समितीचा सदस्य या नात्याने मी आवाहन करतो की सध्यापुरते आंदोलन स्थगित करायला हवे.

आम्ही १० एप्रिलपासून उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथून देशभर किसान क्रांती यात्रा काढण्याचे ठरविले होते. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे बद्रीनाथ बंद करण्यात आले.

सध्या देशापुढे असलेल्या कोरोनाच्या संकटात आपण देशासोबत राहायला हवे असे सांगून भोपाल सिंह म्हणाले, शेतकऱ्यांचे प्राण वाचले तरच त्याल अन्नदाता म्हटले जाईल आणि आंदोलनाला पुढे नेऊ शकेल.

त्यामुळे संयुक्त मोर्चाला आवाहन आहे की एक विराम देऊन कोरोनाचे संकट आहे तोपर्यंत आंदोलन स्थगित करावे. कोरोनाच्या संकटातून आपण बाहेर पडल्यावर आंदोलन पुन्हा सुरू करता येईल. तीनही कृषि कायद्यांविरोधातील आपली लढाई सुरूच राहिल आणि किमान हमी भावावर(एमएसपी) मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही.

Two agitating farmers died on Singhu border, Bhartiy Kisan Union calls for suspension of agitation

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात