Central Govt in speedy action mode : कोविड फैलाव प्रतिबंधसाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना, ऑक्सिजन निर्मिती, आयात, पुरवठा ते लसीकरण


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकार वेगवान हालचालींच्या मोडमध्ये आले आहे. ऑक्सिजन निर्मिती, आयात आणि पुरवठ्यापासून ते लसीकरणापर्यंत सर्वच उपाययोजनांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. केंद्रीय गृह सचिवांपासून आरोग्य सचिव ते एम्सच्या संचालकांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या एकत्रित धोरणाची आणि अंमलबजावणीची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

  • देशभरातील १२ राज्यांनी सर्व वयोगटातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे.
  • देशात ऑगस्ट २०२० पर्यंत ५७०० मेट्रीक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. ते वाढवून आता ९००० मेट्रीक टन एवढे करण्यात आले आहे. याखेरीज परदेशातूनही ऑक्सिजनची आयात करण्यात येत आहे.
  • देशभरात १५०० ठिकाणी ऑक्सिजन प्लँट उभारण्याचे काम सुरू झाले आहे. नायट्रोजन प्लँट्सचे ऑक्सिजन प्लँट्समध्ये रूपांतर करण्याचे नियोजन आहे. ३७ नायट्रोजन प्लँट्स त्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. १४ प्रकारच्या उद्योगांमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते. त्यासाठी तयारी सुरू केली आहे.
  • युरोपीय युनियनच्या सदस्य देशांकडून ऑक्सिजन सकट अन्य वैद्यकीय सामग्री भारतात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. युरोपीय युनियनचे नवी दिल्लीतील सगळे राजदूत यात समन्वय साधत आहेत.
  • डॉ. रणदीप गुलेरियांचे वैद्यकीय सल्ले
  • सीटी स्कॅन आणि बायोमार्कसचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आले आहे. तुम्हाला माइल्ड लक्षणे आढळल्यास लगेच सीटी स्कॅनचा ऑप्शन निवडू नका. एक सीटी स्कॅन छातीच्या ३०० एक्स रेजच्या बरोबरीचे रेडिएशन तयार करते. ते धोकादायक ठरू शकते, अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.
  • तुम्हाला कोविड होऊन तुम्ही त्या संक्रमणातून बरे झाला असलात, तरी कोविड प्रतिबंधक लसीचे तुम्ही दोन्ही डोस घ्या. या सल्ल्याचा नेमका वैद्यकीय अर्थही डॉ. गुलेरिया यांनी समजावून सांगितला आहे. ते म्हणतात, की कोविड संक्रमणामधून बरे झाल्यानंतरही कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणे म्हणजे priming आहे. म्हणजे हा प्राथमिक डोस आहे. तर दुसरा स हा booster म्हणजे तुमची प्रतिकार शक्ती वाढविणारा आहे.
  • होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या लोकांनी आपल्या डॉक्टरच्या संपर्कात राहावे. सॅच्युरेशन ९३ च्या खाली गेले, बेशुद्धीची अवस्था आली, छातीत दुखायला लागले तर डॉक्टरांशी संपर्क साधण्यास वेळ लावू नका.

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात