सरदार वल्लभभाई, इंदिराजी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली; स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ परेडमध्ये भारतीय हॉकी कॅप्टन मनप्रीत सिंग सामील


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचे पोलादी पुरुष आणि पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त आज देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे. याचा मुख्य कार्यक्रम स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ केवङियात सकाळी झाला. Tribute to Sardar Vallabhbhai, Indiraji on the occasion of Punyatithi; Indian hockey captain Manpreet Singh joins the parade near the Statue of Unity

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरदार वल्लभभाई यांना तेथे श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी झालेल्या केंद्रीय राखीव दलाच्या परेडमध्ये भारतीय ऑलिंपिक वीर हॉकी टीमचा कॅप्टन मनप्रीत सिंग सामील झाला. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासमोर त्यांना सलामी दिली.

त्याच वेळी नवी दिल्ली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी शक्तीस्थळ येथे जाऊन इंदिराजींना श्रद्धांजली अर्पण केली.

सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिराजी या दोन्ही नेत्यांना भारताच्या राजकीय शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखण्यात येते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या राजकीय कौशल्याने आणि कणखर धोरणाने पाचशेपेक्षा अधिक भारतीय संस्थानांचे भारतीय संघराज्यात मधील विलीनीकरण केले, तर इंदिराजींनी आपल्या नेतृत्व काळात पाकिस्तान विरोधातले युद्ध जिंकून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली. या दोन्ही नेत्यांना देशभर पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येत आहे आहे.

Tribute to Sardar Vallabhbhai, Indiraji on the occasion of Punyatithi; Indian hockey captain Manpreet Singh joins the parade near the Statue of Unity

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात