वृत्तसंस्था
काशी : गंगा आणि वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराला जोडणाऱ्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या कामाला अंतिम रूप देण्याची जोरदार तयारी सुरु आहे.Transformation of Kashi Vishwanath Temple; Narendra Modi inaugurates the corridor on December 13
श्री काशी विश्वनाथ विशेष क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा म्हणाले की कॉरिडॉरच्या बाजूने २४ इमारती बांधल्या गेल्या आहेत आणि कॉरिडॉरला अंतिम टच देण्यात येत आहे. जे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्णपणे तयार होईल.
कॉरिडॉरच्या बाजुच्या इमारतींच्या भिंतींवर श्लोक आणि वैदिक स्तोत्रे कोरली जात आहेत. त्यासाठी अंदाजे खर्च एक हजार कोटी आहे. दरवर्षी सात दशलक्षाहून अधिक भाविक आणि पर्यटक मंदिराला भेट देतात. सरासरी, १० हजार पेक्षा जास्त भाविक, बहुतेक वाराणसी आणि आसपासच्या भागातील, दररोज याला भेट देतात.
सोमवारी, ४० हजार ते ५० हजार लोक मंदिरात प्रार्थना करतात. पवित्र श्रावण महिन्यात (जुलै-ऑगस्ट) सोमवारी ही संख्या ३ लाख पर्यंत जाते.५.५ लाख चौरस फुटांवर बांधलेल्या, कॉरिडॉरने मंदिर परिसरात गर्दी कमी होण्यास मोठी मदत मिळाली आहे. पूर्वी तीन बाजूंनी इमारतींनी हा परिसर वेढलेला होता.
प्रकल्पात काय नेमके आहे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App