वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजपवर प्रचंड तोफा डागून प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष फोडण्याची खेळी करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच पावलावर पाऊल टाकत शरद पवारांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली आहे. Pawar followed Mamata; Congress broke up in Delhi !!; G-23 leader slapped on NCP’s neck !!
दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते योगानंद शास्त्री यांनी काँग्रेसमधून राजीनामा देऊन शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. योगानंद शास्त्री यांचे शरद पवार यांनी आपल्या दिल्लीतल्या 6 जनपथ या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले आहे. आत्तापर्यंत फक्त ममता बॅनर्जी याच काँग्रेस फोडण्यामध्ये आघाडीवर होत्या. पण आता त्यांना शरद पवार हे देखील जॉईन झाले आहेत. त्यांनी देखील दिल्लीत भाजप नेतृत्व गळाला लावण्याच्या ऐवजी काँग्रेसचे जुने नेते योगानंद शास्त्री यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लावले आहे. योगानंद शास्त्री यांनी सन 2020 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्याआधी ते दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष होते.
Delhi: Former Speaker of Delhi Assembly, Yoganand Shastri joins NCP in the presence of party chief Sharad Pawar. Shastri had resigned from Congress in 2020. pic.twitter.com/tuPaCy2OQk — ANI (@ANI) November 17, 2021
Delhi: Former Speaker of Delhi Assembly, Yoganand Shastri joins NCP in the presence of party chief Sharad Pawar.
Shastri had resigned from Congress in 2020. pic.twitter.com/tuPaCy2OQk
— ANI (@ANI) November 17, 2021
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ज्या जी – 23 नेत्यांनी पत्र लिहिले आहे, त्यामध्ये योगानंद शास्त्री यांचा देखील समावेश आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांच्याबरोबर योगानंद शास्त्री यांनीदेखील जी – 23 नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षरी केली होती. काँग्रेसमध्ये लोकशाही प्रक्रियेतून पर्मनंट अध्यक्ष निवडावा अशी त्यांची मागणी होती. परंतु गेल्या दीड वर्षात यामध्ये कोणतीही हालचाल झाली नसल्याचे जी – 23 नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच योगानंद शास्त्री यांनी आज आपला वेगळा मार्ग पत्करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App