Balaghat Plane Crash : मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये चार्टर्ड विमान कोसळले; पायलट आणि को-पायलट ठार

Balaghat Plain Crash

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटसोबत एक महिला ट्रेनी पायलट होती.

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशातील बालाघाट येथे आज (१८ मार्च) दुपारी एक चार्टर विमान कोसळले. विमानात पायलट आणि को-पायलट होते. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव व शोधकार्य सुरू केले. Training aircraft crashes in Ms Balaghat police team on spot

बालाघाट जिल्ह्यातील लांजी आणि किरणापूर दरम्यानच्या भक्कुटोला-कोसमरा टेकडीवर हा अपघात झाला. खडकात एक जळालेला मृतदेह दिसत होता, तर अधिकारी दुसऱ्याचा शोध घेत होते. अपघाताची माहिती मिळताच बालाघाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटसोबत एक महिला ट्रेनी पायलट होती.


NIAकडून PFIच्या मुसक्या आळवणे सुरूच; महिनाभरात दाखल केलं पाचवं आरोपपत्र, बँक खातीही गोठवली


हे विमान महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाचे प्रशिक्षणार्थी विमान होते. विमानाने बिरसी हवाई पट्टीवरून उड्डाण केले होते, ज्याला अपघात झाला आहे. हे ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताच्या १५ मिनिटे आधी विमानाने बिरसी विमानतळावरून उड्डाण केले होते. वैमानिक मोहित आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक वर्सुका विमानात होते असे सांगितले जात आहे. सध्या बचाव पथक तेथे पोहोचले आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Training aircraft crashes in Ms Balaghat police team on spot

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात