कशी होती मुंडे – गडकरी केमिस्ट्री??; गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरणात नितीन गडकरींनी सांगितले किस्से


प्रतिनिधी

नाशिक : 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या झंजावातामुळे शिवसेना – भाजप युतीची सत्ता आली. त्यावेळी गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या दोन्ही नेत्यांची केमिस्ट्री कशी होती??, याच्या आठवणींना नितीन गडकरींनी गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने उजाळा दिला. How was the Munde-Gadkari chemistry

आज नाशिकमध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहेत. राजकारणात मी ज्यांच्या नेतृत्वात काम केले त्या गोपीनाथ मुंडे यांचा मला अभिमान आहे. मी भाजपचा अध्यक्ष झालो तेव्हा फक्त दोनच व्यक्तींना खाली वाकून नमस्कार केला. त्यात एक होते आडवाणी आणि दुसरे गोपीनाथ मुंडे. युतीच्या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे यांनी मला विचारले, तुला कोणते खाते पाहिजे?, त्यावेळी मला त्यांनी बांधकाम खाते दिले आणि त्याच काळात पुणे-मुंबई  महामार्गाचे काम झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.

 

लोकांसाठी जीवाची बाजी लावणारा नेता 

पुढे बोलताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचं भाजपसाठी मोठं योगदान आहे. पक्ष मोठा करण्यात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचा सिंहाचा वाटा आहे. गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे 1995 ला आमची सत्ता आली. आपल्या लोकांसाठी जीवाची बाजी लावणारा हा नेता होता. त्यांनी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, ओबीसी ऊसतोड कामगारांना न्याय मिळून दिल्याचे गडकरींनी सांगितले.

How was the Munde-Gadkari chemistry

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात