रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!


 युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाची प्रतिक्रिया आली समोर, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : युक्रेनच्या युद्ध अपराधांसंबंधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने  (ICC) अटक वॉरंट जारी केले आहे. रशियाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.  युक्रेनमध्ये होणाऱ्या युद्ध आणि इतर अपराधांसाठी व्लादिमिर पुतीन यांना जबाबदार धरलं आहे. तर मॉस्कोने या संदर्भातल्या आरोपांचं खंडन केलं आहे.  रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे. International Criminal Court issues arrest warrant for Russian President Putin


नव्या भारताला मदरशांची गरज नाही, आसाममधील सर्व मदरसे लवकरच बंद होतील – मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा!


न्यायालयाने आपल्या म्हटले आहे की, रशियाने युक्रेनच्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून युक्रेनियन मुलांचे बेकायदेशीरपणे स्थलांतरनासाठी पुतिन कथितपणे जबाबदार आहेत. या आरोपांखाली, राष्ट्रपती कार्यालयातील बाल हक्क आयुक्त मारिया अलेक्सेयेव्हना लव्होवा-बेलोवा यांच्याविरुद्ध वॉरंटही जारी करण्यात आले आहे.

ही फक्त सुरुवात आहे : झेलेन्स्की

याप्रकरणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे वक्तव्यही समोर आले आहे. व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले अटक वॉरंट ही केवळ सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयसीसीचे वकील करीम खान यांनी वर्षभरापूर्वी युक्रेनमध्ये संभाव्य युद्ध गुन्हे, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहाराची चौकशी सुरू केली.

व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशानं २४ फेब्रुवारी २०२२ ला रशियानं यूक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई सुरु केली होती. त्यावेळी यक्रेन रशियासमोर शरणागती पत्करेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र, रशियाला जे अपेक्षित होतं तसं घडलेलं नाही.

International Criminal Court issues arrest warrant for Russian President Putin

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात