Tractor Driven by Rahul Gandhi : सोमवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर चालवून संसदेत पोहोचल्यामुळे चर्चेत आले आहेत. परंतु जे ट्रॅक्टर त्यांनी वापरले त्याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. हे ट्रॅक्टर आता दिल्ली पोलिसांनी जप्त केले आहे. पावसाळी अधिवेशनामुळे अतिसुरक्षित असणाऱ्या या भागात कलम 144 लागू आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत आले, म्हणून ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. Tractor Driven by Rahul Gandhi Confiscated By Delhi Police Parliament Monsoon Session Farm Laws
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सोमवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर चालवून संसदेत पोहोचल्यामुळे चर्चेत आले आहेत. परंतु जे ट्रॅक्टर त्यांनी वापरले त्याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. हे ट्रॅक्टर आता दिल्ली पोलिसांनी जप्त केले आहे. पावसाळी अधिवेशनामुळे अतिसुरक्षित असणाऱ्या या भागात कलम 144 लागू आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत आले, म्हणून ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
ट्रॅक्टर चालवत राहुल गांधी संसदेत पोहोचले आणि कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाचे समर्थन करताना त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रणदीप सुरजेवाला, दीपेंद्र हुडा आणि कॉंग्रेसचे अनेक नेते राहुल गांधी यांच्यासमवेत ट्रॅक्टरवर होते. दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि श्रीनिवास बी. यांना ताब्यातही घेतले होते.
संसदेत पोहोचताना राहुल गांधींनी माध्यमांना सांगितले, “आम्ही शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत आलो आहोत. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. हे कायदे 2-3 बड्या उद्योगपतींसाठी आहेत. हे शेतकर्यांच्या फायद्याचे नाहीत. हे काळे कायदे आहेत.” यामुळे कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून संसदेतही मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App