तृणमूळ काँग्रेस की मुस्लीम लीग…??; बंगालमध्ये ही तर अघोषित direct action


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : तृणमूळ काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयानंतर पश्चिम बंगालच्या ७ मुस्लीम बहुल जिल्ह्यांमध्ये जे घडतेय… त्याला अघोषित direct action म्हणण्यासारखीच परिस्थिती आहे. बॅ. महंमद अली जीना यांनी १६ ऑगस्ट १९४६ रोजी पाकिस्तान निर्मितीसाठी कोलकात्यात direct action ची घोषणा केली होती… त्यावेळी ५००० हिंदूंची भर रस्त्यावर कत्तल करण्यात आली होती. हजारो हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले होते. याची भयाण – भीषण चित्रे आजही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आता ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसने पश्चिम बंगालच्या मुस्लीम बहुल जिल्ह्यांमध्ये त्याच direct action चे अघोषित अनुकरण सुरू केलेले दिसते आहे. TMC or Muslim League…?; undecleared direct action in west bengal

यात फरक हा आहे, की आता तृणमूळ काँग्रेसच्या अघोषित direct action चा परिघ राज्यातल्या ७ मुस्लीम बहुल जिल्ह्यांपर्यंत वाढलेला दिसतो आहे. आम्ही ३० टक्के आहोत. केव्हाही एकजूट करून नवीन पाकिस्तान निर्माण करू, अशी धमकी तृणमूळच्या नेत्याने बीरभूम जिल्ह्यातच दिली होती. ती आता तृणमूळ काँग्रेस प्रत्यक्षात आणताना दिसते आहे.

-हजारो कुटुंबे भीतीने रस्त्यावर

भाजपला निवडणुकीत मदत केल्याच्या आरोपावरून तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी पश्चिम बीरभूम जिल्ह्यातील नन्नूर गावात प्रचंड हिंसाचार सुरू केला आहे. हजारो हिंदू कुटुंबे भीतीने रस्त्यावर येऊन बसली असल्याचे चित्र आहे. तृणमूळचे गुंड त्यातील महिलांची छेडछाड करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने केंद्रीय सुरक्षा दलांना या भागात पाठवावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार सपन दासगुप्ता यांनी केली आहे.



तर भाजपच्या दोन महिला निवडणूक एजंटवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे ट्विट दीप हलधर यांनी केले आहे. तृणमूळच्या खासदार महुआ मोईत्रांना मात्र नवी दिल्लीच्या निवडणूक आयोगाचे कार्यालय लोकशाहीची स्मशानभूमी झाल्याचे वाटत आहे. मात्र, अख्खा पश्चिम बंगाल हिंदूंसाठी स्मशानभूमी झाल्याची महुआंना अजिबात खंत वाटत नाही.

सपन दासगुप्ता यांनी या भीषण घटनेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. येथील परिस्थितीचे वर्णन करताना ते म्हणाले, हजारो हिंदू कुटुंबे हल्याच्या भीतीने रस्त्यावर येऊन बसली आहेत. त्यांच्यातील महिलांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. शेकडो गुंड त्यांची छेडछाड करीत आहेत. बंगालचे पोलीस त्यांना रोखतही नाहीत. त्यामुळे केंद्राने आपल्या सुरक्षा दलांना पाठवावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच हिंसाचार सुरू झाला आहे. ज्या गावांनी तृणमूल कॉँग्रेसला विरोध केल्याचा संशय आहे, तेथे हिंसाचार सुरू करण्यात आला आहे. यात आत्तापर्यंत ठार झालेल्यांचा अधिकृत आकडा ९ आहे. यामध्ये प्रामुख्याने हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे.

TMC or Muslim League…?; undecleared direct action in west bengal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात