तृणमूल कॉँग्रेसच्या भीतीने बीरभूम जिल्ह्यात हजारो हिंदू कुटुंबे रस्त्यावर, गुंडांकडून महिलांची छेडछाड

भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत मदत केल्याच्या आरोपावरून तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील नन्नूर गावात प्रचंड हिंसाचार सुरू करण्यात आला आहे. हजारो हिंदू कुटुंबे भीतीने रस्त्यावर  येऊन बसले आहेत. त्यातील महिलांची गुंडांकडून छेडछाड होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने केंद्रीय सुरक्षा दलांना या भागात पाठवावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे  खासदार सपन दासगुप्ता  यांनी केली आहे. Thousands of Hindu families on the streets in Birbhum district for fear of Trinamool Congress, women being molested by goons

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत मदत केल्याच्या आरोपावरून तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील नन्नूर गावात प्रचंड हिंसाचार सुरू करण्यात आला आहे. हजारो हिंदू कुटुंबे भीतीने रस्त्यावर  येऊन बसले आहेत. त्यातील महिलांची गुंडांकडून छेडछाड होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने केंद्रीय सुरक्षा दलांना या भागात पाठवावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे  खासदार सपन दासगुप्ता  यांनी केली आहे.



सपन दासगुप्ता यांनी या भीषण घटनेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. येथील परिस्थितीचे वर्णन करताना ते म्हणाले, हजारो हिंदू कुटुंबे हल्याच्या भीतीने रस्त्यावर येऊन बसले आहेत. त्यांच्यातील महिलांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. गुंडांकडून त्यांची छेडछाड सुरू आहे. बंगालमधील पोलीसांकडून त्यांना रोखण्यात येत नाही. त्यामुळे केंद्राने आपल्या सुरक्षा दलांना पाठवावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच हिंसाचार सुरू झाला आहे. ज्या गावांनी तृणमूल कॉँग्रेसला विरोध केल्याचा संशय आहे, तेथे हिंसाचार सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे.

अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबाबत येथील पोलीसांकडून अहवाल मागविला आहे. परिस्थिती तातडीने आटोक्यात आणावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

Thousands of Hindu families on the streets in Birbhum district for fear of Trinamool Congress, women being molested by goons

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात