“आता हा फोटो व्हायरल होणार नाही” – शशी थरुर

 

शशी थरूर यांनी सोमवारी महिला खासदारांसोबत ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता.शशी थरूर यांनी या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनवरून वाद निर्माण झाला होताThis photo will not go viral now” – Shashi Tharoor


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात झाली. पहिल्या दिवशी सर्वांचे लक्ष तीन कृषी कायदे मागे घेणाऱ्या विधेयकाकडे लागले होते. तर दुसरीकडे, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू होती. ती म्हणजे शशी थरूर यांच्या ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोची.

शशी थरूर यांनी सोमवारी महिला खासदारांसोबत ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता.शशी थरूर यांनी या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनवरून वाद निर्माण झाला होता.”कोण म्हणतं लोकसभा काम करण्यासाठी एक आकर्षक जागा नाही,” असं त्यांनी फोटोसह लिहिलं होतं. या कॅप्शनवर अनेकांनी टीका केल्या होत्या.त्यानंतर थरूर यांना माफीही मागावी लागली होती.

यानंतर आता त्यांनी पुरुष खासदारांसोबत एक सेल्फी शेअर केला आहे.यानंतर त्यानी मंगळवारी पुरूष खासदारांसोबत फोटो शेअर केला. यात त्यानी तीन सेल्फी पोस्ट केले. हे व्हायरल होण्याची आशा नाही, असं त्यांनी कॅप्शन देताना म्हटलं. परंतु यानंतरही काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं.

This photo will not go viral now” – Shashi Tharoor

 

महत्त्वाच्या बातम्या