प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्याच्या प्रस्तावाला केंद्रातील मोदी सरकारने मंजुरी दिल्यानंतर सर्व विरोधी पक्षातील मुस्लिम नेत्यांनी त्यावर वेगवेगळ्या भाषेत आक्षेप नोंदवला आहे. परंतु काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी मात्र या संदर्भात वेगळा पण अनुकूल सूर काढला आहे.There is no point in simply raising the age of marriage for girls, there should be strict laws against child marriage; Opinion of Congress leader Jairam Ramesh
जयराम रमेश यांना ट्विट करून एक वेगळा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रख्यात लोकसंख्या शास्त्रज्ञ टी. व्ही. शेखर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतामध्ये फक्त मुलींचीच लहान वयात लग्ने होतात असे नाही, तर मुलांचीही लहान वयात लग्ने होतात. भारतातल्या एकचतुर्थांश मुलींची लग्ने वयाच्या 18 वर्षांच्या आत होतात, तर 18 % मुलांची लग्ने वयाच्या 21 वर्षाच्या आत होतात.
याचा अर्थ फक्त मुलींचे लग्नाचे वय वाढवून उपयोग नाही तर एकूण बालविवाह संदर्भातच एक विशिष्ट दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे आणि बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींचे प्रबोधन करून बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी कायदा केला पाहिजे असे मत जयराम रमेश यांनी व्यक्त केले आहे.
Leading demographer TV Sekher points out while 1/4th of women in India still get married before 18, 18% of men get married before 21. Early marriage is an issue of not only girls, but also boys in rural India. He’s right in saying we need to tackle larger malaise of child grooms. pic.twitter.com/ITv8Yeblp2 — Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 18, 2021
Leading demographer TV Sekher points out while 1/4th of women in India still get married before 18, 18% of men get married before 21. Early marriage is an issue of not only girls, but also boys in rural India. He’s right in saying we need to tackle larger malaise of child grooms. pic.twitter.com/ITv8Yeblp2
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 18, 2021
विरोधी पक्षांनी मधले अनेक मुस्लीम नेते मुलींचे विवाहाचे वय वाढविण्याच्या विरोधात असताना जयराम रमेश यांच्यासारख्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने बाल विवाहाला प्रतिकूल आणि सरकारने टाकलेल्या पावलाला अनुकूल मत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App