पत्नी पतीच्या संपत्तीची पूर्ण नाही मालकीण; सर्वोच्च न्यायालयाने आदेशासह घातली अट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पत्नी पतीच्या संपत्तीची पूर्ण मालकीण नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यासाठी काही अटी सुद्धा घातल्या आहेत. एका खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने म्हंटले कि, हिंदू पुरुषाने मृत्यूपत्रात पत्नीला मर्यादित वाटा दिला तर तिल त्याच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार मानला जाणार नाही. The wife is not the sole owner of the husband’s property for life,” the apex court ruled

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने १९६८ च्या मृत्यूपत्राच्या प्रकरणात हा आदेश दिला. हरियाणातील तुलसी राम या व्यक्तीने हे मृत्युपत्र लिहिले होते, त्यांचे १७ नोव्हेंबर १९६९ रोजी निधन झाले.कायदा काय आहे

मालमत्तेच्या उत्तराधिकाराच्या बाबतीत, उत्तराधिकार कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील उत्तराधिकाराचे नियम लागू होतात. कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता दोन प्रकारची असते. पहिला प्रकार म्हणजे त्याने घेतलेली मालमत्ता आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याला वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता.

परिस्थितीवर अवलंबून

ज्या स्त्रीने विशिष्ट मालमत्ता मिळविलेल्या व्यक्तीशी विवाह केला असेल त्या स्त्रीचा त्या व्यक्तीच्या मालमत्तेत हक्क आहे की नाही हे प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. आम्हाला या प्रश्नांची उत्तरे केसच्या परिस्थितीत, भारतीय उत्तराधिकार कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्यात मिळतात.

ज्याच्या मालमत्तेवर त्याचा पूर्ण अधिकार

हे स्पष्ट आहे की जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वतः कोणतीही मालमत्ता घेते तेव्हा त्या व्यक्तीचा त्या मालमत्तेवर पूर्ण अधिकार असतो. तो मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकतो मग त्याची मालमत्ता स्थावर असो वा जंगम. मग ते सोने-चांदी किंवा जमीन किंवा घर असो.

The wife is not the sole owner of the husband’s property for life,” the apex court ruled

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय