भारतीय कायद्याचे पालन करा अन्यथा भारतातून गाशा गुंडाळा, उच्च न्यायालयाचा ट्विटरला इशारा


विशेष प्रतिनिधी

हैद्राबाद : भारतीय कायद्याचे पालन करा अन्यथा भारतातून गाशा गुंडाळा, असा कडक इशारा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म ट्विटरला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. प्लॅटफॉर्मवरून न्यायव्यवस्थेविरुद्ध अपमानास्पद मजकूर मागे घेण्याच्या आदेशाचे ट्विटरने पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.Obey Indian law otherwise leave from India, High Court warns Twitter

मुख्य न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती एम. सत्यनारायण मूर्ती यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सोमवारी सांगितले की ट्विटर भारतीय कायद्याशी लपूनछप खेळू शकत नाही आणि भारतात काम करायचे असल्यास देशाच्या कायद्याचे पालन केले पाहिजे. हे स्पष्टपणे अवमानाचे प्रकरण आहे आणि ट्विटरवर फौजदारी कारवाई केली जाऊ शकते.खंडपीठाने गुगलच्या विरोधात नुकत्याच दिलेल्या निकालाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खंडपीठाकडे अपमानास्पद मजकूराचा संदर्भ देत, सहाय्यक सॉलिसिटर जनरल एस.व्ही. कोटार्ने मागे घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही, ट्विटरवर अशा सोशल मीडिया पोस्ट्स अजूनही दिसत असल्याचे राजू यांनी सीबीआयतर्फे हजर राहून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

ट्विटर भारतीय नागरिक असलेल्या लोकांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अपमानास्पद मजकूर काढून टाकते. परंतु, भारतात राहणाऱ्या आणि दुसऱ्या देशाचे राष्ट्रीयत्व सांगणाऱ्या लोकांच्या अकाउंटवरून अजूनही अपमानजनक मजकूर हटवला जात नाही. ही अडचण यूट्यूब आणि फेसबुकमध्ये नसून फक्त ट्विटरच्या बाबतीत आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.

Obey Indian law otherwise leave from India, High Court warns Twitter

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण