गोव्याच्या राजकारणात खंजीराचा खणखणाट; पण पवारांचा नव्हे, मग कोणाचा??


प्रतिनिधी

पणजी : गोव्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस झाले खंजीराच्या राजकारणाचा जोरदार खणखणाट पाहायला मिळतो आहे. पण खंजीराचा हा विषय शरद पवारांचा नसून तो शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचा आहे…!!

भाजपने गेल्या पाच वर्षात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका असायची की ज्यांच्याशी मैत्री केली ती स्वच्छपणे पुढे नेली पाहिजे. एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे शिवसेना महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमध्ये निवडणूक लढवत नव्हती. परंतु, गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने शिवसेना आणि एनडीए मधल्या अन्य घटक पक्ष यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आम्हाला बाहेर पडावे लागले. आम्ही निवडणुका लढवायला लागलो, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.आदित्य ठाकरे यांना भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी देखील प्रत्युत्तर दिले. शिवसेनेच्या पाठीत आम्ही खंजीर खुपसला नाही, तर शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा प्रत्यारोप रावसाहेब पाटील दानवे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वारंवार जाहीर व्यासपीठांवरून सांगत होते की देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री असतील. परंतु, निवडणूक जिंकल्यानंतरही शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची पाठवून मुख्यमंत्रीपद मिळवले, असा टोला रावसाहेब पाटील दानवे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आदित्य ठाकरे यांना इतिहास नीट माहिती नाही. त्यांनी तो वाचलेला नाही. भाजपच्या शिवसेनेने शिवसेनेच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसलेला नाही, तर शिवसेनेने भाजपचा पाठीत खंजीर खुपसला आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना गेली 25 वर्षे महाराष्ट्राबाहेर गोवा, उत्तर प्रदेशात निवडणूक लढवली आहे. परंतु, त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट सातत्याने जप्त होत आहेत, याची आठवण देखील देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दात करून दिली.

पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे काय?

“पाठीत खंजीर खुपसणे” हा शब्दप्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यापासून सुरू झाला. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार मुख्यमंत्री झाले, असा आरोप 1978 मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने पवार यांच्या राजकारणाचे वर्णन करताना विरोधक आणि विश्लेषक “पाठीत खंजीर खुपसणे” या शब्दप्रयोगाचा वापर करतात. परंतु, आता शिवसेना आणि भाजप यांच्या संबंधांतून विस्तव जात नसताना या दोन पक्षांचे नेते एकमेकांविरोधात “पाठीत खंजीर खुपसणे” या शब्दप्रयोगाचा वापर करत आहेत.

The sound of daggers in Goa’s politics; But not Pawar’s, then whose ??

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था