मनरेगाच्या कामाचा योग्य दाम कसा मिळेल यावर चर्चा ; किसान सभा, श्रमिक व प्रशासन यांची विशेष बैठक


विशेष प्रतिनिधी

पुणे : जिल्ह्यातील,जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये,किसान सभेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून व प्रशासनाच्या सहकार्याने,रोजगार हमीची कामे अधिकाधिक सुरू होत आहे. अजूनही काही गावात मनरेगाची कामे सुरू करण्यासाठी संघटनेचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. Discussion on how to get fair price for MGNREGA work ; Special meeting of Kisan Sabha, Labor and Administration

आंबेगाव आणि जुन्नर या,दोन्ही तालुक्यातील आदिवासी भागात असलेले,वनक्षेत्र लक्षात घेता,रोजगार हमीची अधिकाधिक कामे वनक्षेत्रात होऊ शकतात, व यातून रोजगार निर्मिती जशी होऊ शकते तसेच जंगलाचे संवर्धन ही होऊ शकते. परंतु,वनविभागा अंतर्गत केली जाणारी रोजगार हमीची काही कामे, ही मजुरांना, रोजगाराच्या दृष्टीने परवडत नाहीत,असा अनुभव आहे.

याबाबत असलेल्या समस्या, समजून घेऊन कोणत्या उपाययोजना करता येतील,यासाठी चावंड (ता.जुन्नर) येथे, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, किसान सभेचे पदाधिकारी, चावंड गावातील रोजगार हमीच्या कामावर येणारे श्रमिक यांची एकत्रित बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत वनविभाग, मनरेगा अंतर्गत जी कामे घेतात,त्या कामाचे जे अंदाजपत्रक तयार केले जाते, त्या अंदाजपत्रकाविषयी सांगोपांग चर्चा करण्यात आली. यातून अंदाजपत्रक पुढील काळात कसे बनवता येईल याविषयी व मजुरांना त्यांच्या कामाचा योग्य दाम कसा मिळेल याविषयी चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले.



वनविभाग जे अंदाजपत्रक तयार करते ते अंदाजपत्रक मनरेगाच्या दरसूची नुसार तयार करण्यात येईल.
अंदाजपत्रकात जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे मातीचा स्तर, दगड गोटे मिश्रित माती, मऊ मुरूम, कठीण मुरूम, मोठे दगड, यानुसार दर लावले जातील,सरसकट फक्त मातीचा दर लावला जाणार नाही.

वनविभागाच्या सर्व कामांबाबत प्रत्येकी एक-एक मॉडेल अंदाजपत्रक तयार करताना, पंचायत समिती मधील, तांत्रिक अधिकारी यात सर्व ते सहकार्य वनविभागास करतील. अंदाजपत्रक तयार करण्याच्या अगोदर कामाच्या शक्य त्या ठिकाणी डेमो घेण्याचे ठरले.

महिना आणि ऋतुमानानुसार कामांचे वर्गीकरण करून त्या प्रमाणे शेल्फ निर्माण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल. वनविभागाचे अधिकारी, रोजगार हमीच्या अभ्यासक,पंचायत समिती मधील तांत्रिक अधिकारी, ग्रामरोजगार सेवक,किसान सभेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व रोजगार हमीवर काम करण्यास येणारे श्रमिक यांनी एकत्रित येत,काम करताना येणारया प्रशासकीय व तांत्रिक अडचणींवर मात काढत एक सुसंवादाचा यशस्वी प्रयत्न या बैठकीतून निर्माण झाला आहे.

या बैठकीला रोजगार हमीच्या तज्ञ व अभ्यासक सीमा काकडे, जुन्नरचे वनपरीक्षेत्र अधिकारी शिंदे , आंबेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे , किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे, जुन्नर विभागाचे वनपाल शशिकांत मडके, जुन्नर तालुका रोजगार हमी योजना समिती सदस्य आणि पुणे विभागीय आयुक्त वन हक्क समिती सदस्य किरण लोहकरे,जुन्नर पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी जितेंद्र भोर, आंबेगावचे सी.डी.इ.ओ. आशिष हुले, तांत्रिक अधिकारी लखन रेडेकर, वनरक्षक कवटे , आर.एस.माहोरे, पुणे जिल्हा किसान सभा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, बाळू वायाळ,राजेंद्र घोडे, तालुका सचिव, लक्ष्मण जोशी, सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच माधुरी कोरडे, किसान सभा सदस्य कोंडीभाऊ बांबळे,तुळसाबाई उतळे रोजगार सेवक संदीप शेळकंदे, नारायण वायाळ, रोहिदास शेळकंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर चावंड गावातील मजुर,ग्रामस्थ उपस्थित होते.

ही बैठक आयोजित करण्यामध्ये जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुष प्रसाद,जिल्हा परिषद नरेगा बी.डी.ओ.श्रीमती देव , जुन्नर आणि आंबेगावचे तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संघटनेने त्यांचे आभार मानले.

Discussion on how to get fair price for MGNREGA work ; Special meeting of Kisan Sabha, Labor and Administration

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात