शिक्षक भरती घोटाळ्यावरून ममतांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये फुटीची बीजे!!; पार्थ चॅटर्जींच्या हकालपट्टीची पक्षातूनच मागणी


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगाल मधल्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या केस मध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे छापे सुरूच आहेत. अर्पिता मुखर्जीच्या घरातून कोट्यावधी रुपयांचे घबाड ईडीने जप्त केले आहे. पण त्याचबरोबर आता याच घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये फुटीची बीजे फोफावताना दिसत आहेत. The seeds of a split in Mamata’s Trinamool Congress over the teacher recruitment scam

राज्याचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांना ईडीने शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. तरी देखील त्यांना ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवलेले नाही. पार्थ चटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवावे आणि पक्षाच्या सर्व पदांचा त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी तृणमूळ काँग्रेसचे प्रदेश सचिव कुणाल घोष यांनी केली आहे. पार्थ चॅटर्जी शिक्षक भरती घोटाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही ते मंत्रिपदे राहत असल्याने तृणमूळ काँग्रेसची राजकीय प्रतिमाहानी होत आहे.

कायद्यानुसार त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे ही भूमिका तृणमूळ काँग्रेसने घ्यायला हवी आणि त्यांना मंत्रिपदावरून बाजूला करायला हवे, असे मत कुणाल घोष यांनी व्यक्त केले आहे. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हानही दिले असून माझ्या मागणीत जर काही चूक आढळली तर मला सुद्धा पक्षाच्या सर्व पदांवरून बाजूला करावे. कारण कोणत्याही व्यक्ती पेक्षा मी पक्ष मोठा मानतो, असे वक्तव्य देखील कुणाल घोष यांनी केले आहे.

– तृणमूळ काँग्रेसचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात

पार्थ चॅटर्जी यांच्या विरोधात पक्षातूनच असे विरोधी सुरू उमटू लागल्याने तृणमूळ काँग्रेसमध्ये सारे काही अलबेल सुरू नाही हे स्पष्ट दिसत आहे. कालच भाजपचे नेते आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूळ काँग्रेसचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर कुणाल घोष यांनी उघडपणे पार्थ चॅटर्जी यांच्या हकालपट्टीची मागणी करणे याला विशेष राजकीय महत्त्व आहे. तृणमूळ काँग्रेसमध्ये शिक्षक भरती घोटाळ्याच्या निमित्ताने फुटीची बीजे फोफावत असल्याचे यातून दिसून येत आहे.

The seeds of a split in Mamata’s Trinamool Congress over the teacher recruitment scam

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात