उमेश कोल्हे हत्येतील आरोपी शाहरुख पठाणला आर्थर रोड तुरुंगात इतर कैद्यांकडून बेदम मारहाण, नूपुर शर्मा प्रकरणात झाली होती कोल्हेंची हत्या


प्रतिनिधी

मुंबई : अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख खान पठाणला शनिवारी आर्थर रोड कारागृहात पाच कैद्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने कोल्हे हत्येतील आरोपींना वेगवेगळ्या बराकींमध्ये हलवले.Umesh Kolhe murder accused Shah Rukh Pathan brutally beaten by other inmates in Arthur Road Jail

नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट केल्याबद्दल कोल्हे यांची २१ जून रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शेख इरफान, मुदस्सीर अहमद (२२), शाहरुख पठाण (२५), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतीब रशीद (२२) आणि युसूफ खान बहादूर खान (४४) यांना अटक करण्यात आली होती. हे सर्व आरोपी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनअायए) ताब्यात असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्वांना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे.



शनिवारी पठाणवरील हल्ल्याच्या वेळी हे सर्व कैदी एकाच बराकीत होते. शाहरुख खानने इतर कैद्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला असता कैद्यांनी त्याला चाेप दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी मुंबईच्या एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सर्व आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवण्यात यावे, असा अर्ज आरोपींच्या वतीने मुंबई जिल्हा न्यायालयात करण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेबद्दल तुरुंग प्रशासनानेही विशेष एनआयए न्यायालयात अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार आर्थर रोड प्रशासनानेही आरोपींना इतरत्र हलवण्यास अनुकूलता दर्शवली असून एनआयएलाही त्याबाबत हरकत नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी इतर तुरुंग अधिकाऱ्यांचे म्हणणे न्यायालयाने मागवले अाहे.

5 कैद्यांविरुद्ध गुन्हा

शाहरुख नावाच्या आरोपीला शनिवारी आर्थर रोड कारागृहात पाच कैद्यांनी मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाच कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Umesh Kolhe murder accused Shah Rukh Pathan brutally beaten by other inmates in Arthur Road Jail

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात