शाहीनबाग : “कागज नही दिखायेंगे” प्रवृत्तीचे संविधानाचे पांघरूण; झुंडशाहीचे वर्तन!!

“संविधानाचे पांघरूण, झुंडशाहीचे वर्तन” हेच स्वरूप शाहीद बागेत आज पुन्हा एकदा दिसले. शाईन बागेतील झुंडशाही पुढे दिल्लीच्या कायदेशीर बुलडोजरला आज मागे जावे लागले.
The same pattern of covering the constitution, the behavior of mob rule was seen once again in Shahid Bagh today

– सीएए विरोधात झुंडशाही

भारतीय नागरिकत्व कायदा अर्थात सीएए आणि नॅशनल रजिस्टर सिटीजन अर्थात एनआरसी या दोन कायद्यांना विरोध करताना नेमके हेच झुंडशाहीचे स्वरूप दिसले होते. संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे. संविधानाला बाजूला करून भारतीय नागरिकत्व कायदा अथवा एनआरसी आमच्यावर लागू करता येणार नाही, असाच तर दावा शाहीनबागेतले तथाकथित स्वातंत्र्यवादी करत होते. पण हा दावा करताना लोकशाही मार्गाने करण्याऐवजी त्यांनी झुंडशाहीचा वापर केल्याचे दिसून आले होते. कित्येक दिवस दिल्ली रोखून धरण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता ते जमले नाही तेव्हा शाहीनबागेतील महिलांना पुढे करून आंदोलन रेटण्यात आले.

– कृषी कायद्याविरोधात झुंडशाही

झुंडशाहीचे असेच स्वरूप नंतर संविधानाच्या पांघरूण आड लपून कृषी कायद्यांना आले तेव्हाही दिल्लीचा श्वास चहुबाजूंनी कोंडला होता. दिल्लीच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर संविधानाच्या नावाखाली झुंडशाहीचे वर्तन दिसले. अनेकदा तर कोर्टाची देखील अवहेलना झाली. सीएएन – एनआरसी अथवा कृषी कायदे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत दरवाजे ठोठावण्याची विरोधकांना मुभा होती काहींनी ते दरवाजे ठोठावले होते, पण प्रत्यक्षात त्यांच्या हाताला निराशा लागली तेव्हा “हम कागज नही दिखाएंगे” ही प्रवृत्ती झुंडशाही वरच उतरली…!!

कृषी कायदे मोदी सरकारने मागे जरूर घेतले पण त्यामागे झुंडशाही पुढे चुकण्याचा हेतू नव्हता तर शेतकऱ्यांची अधिक समजूत काढून मन वळवण्याचा प्रयत्न होता
सी ए एन आर सी या कायद्यांबाबत मोदी सरकार झुकले नाही, ही बाब या निमित्ताने अधोरेखित करता येऊ शकते.

– ज्ञानवापी परिसरात झुंडशाही

पण ही झुंडशाही आता काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातही दिसली. कोर्टाने सांगूनही वकील कमिशनरला ज्ञानवापी मशिदीची व्हिडीओग्राफी करू देण्यास प्रतिबंध करण्यात आला. हा झुंडशाहीचाचा दुसरा अवतार होता. दोन-तीन दिवसांपूर्वीची ही गोष्ट दिल्लीच्या शाहीन बागेत पुन्हा दिसली. दक्षिण दिल्ली महापालिकेची कायदेशीर बुलडोजर कारवाई झुंडशाहीनेच रोखली. आजही महिलांनाच पुढे करून बुलडोजरवर चढवण्यात आले. बुलडोजर आज या झुंडशाहीपुढे जरूर मागे गेले. पण कोर्टाने यात पुन्हा एकदा मेख मारून ठेवली. सुप्रीम कोर्टाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची याचिका फेटाळून एक प्रकारे दक्षिण दिल्ली महापालिकेच्या बुलडोजर कारवाईला कायदेशीरच शिक्कामोर्तब करून दिले आहे. त्यामुळे उद्या दक्षिण दिल्ली महापालिकेचा बुलडोझर शाहीन बागेतल्या बेकायदा बांधकामावर चालणार हे उघड आहे.

– संविधानाआड लपणे

संविधानाचे आपल्या कथित हक्कांवर गदा आली ती संविधानाच्या मागे लपायचे आणि संविधानाने प्रस्थापित सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की झुंडशाही करायची… ही प्रवृत्ती शहाबानो केस मध्ये दिसली. सीएए – एनआरसी कायद्याच्या वेळी शाहीन बागेत दिसली. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या प्रवेशद्वारांवर दिसली. काल ज्ञानवापी मशीद परिसरात दिसली आणि आज पुन्हा एकदा शाईन बागेत कायदेशीर बुलडोजर ही कारवाई विरोधात दिसली. याचा सरळ अर्थ असा की ही झुंडशाही प्रवृत्ती कठोर कारवाई करून मोडल्याशिवाय सध्याच्या सरकार पुढे पर्याय नाही…!!

The same pattern of covering the constitution, the behavior of mob rule was seen once again in Shahid Bagh today

महत्वाच्या बातम्या