तरंगणाऱ्या विटांनी बांधलेले तेलंगणातील रामप्पा मंदिर जागतिक वारसा यादीत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तरंगणाऱ्या विटांनी बांधलेल्या तेलंगणातील पालमपेट येथील तेराव्या शतकातील रामप्पा मंदिराचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीत करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे. या समावेशासाठी प्रत्येकाचे विशेषत: तेलंगणातील नागरिकांचे अभिनंदन. रामप्पाप मंदिर महान काकातिया राजवंशातील उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे. या मंदिराला भेट देऊन त्याच्या विशालतेचा अनुभव घेण्याचे आवाहन मी करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. The Ramappa Temple in Telangana, built of floating bricks, is a World Heritage Site

जागतिक वारसा समितीच्या आभासी स्वरूपात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. रामप्पा मंदिराचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यासाठी नॉवेर्ने विरोध केला. मात्र, ऐनवेळी रशिया मदतीस धावून आल्याने या वारसा यादीत या मंदिराचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला. रामप्पा मंदिराचा समावेश वारसा यादीत व्हावा, यासाठी 17 देशांनी पाठिंबा दिला.



रामप्पा मंदिर रामलिंगेश्वर मंदिराच्या नावानेही ओळखले जाते. मंदिराचे मुख्य शिल्पकार रामप्पा यांचे नाव या मंदिराला देण्यात आले आहे. हे मध्यकालीन दाक्षिणात्य मंदिर इ.स.पूर्व 1213 मधील आहे. मुख्य सेनापती रुद्र समानी यांच्या संरक्षणात काकातिया राज्यकर्ते गणपती देवा यांनी अतुकुरू प्रांतातली रानाकुडे येथे हे मंदिर बांधले आहे. तेलंगणातील मुलुगू (वारंगल) जिल्ह्यातील व्यंकटपूर मंडळातील पालमपेट येथे हे मंदिर आहे.

या मंदिराची स्थापत्यशैली आश्चर्यचकीत करणारी आहे. मंदिराच्या भिंती, खांब आणि छतावरील नक्षिकाम अत्यंत सुरेख आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे, बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा वजनाने अत्यंत हलक्या पण कठीण आहेत. या विटा पाण्यावर तरंगतात. आयाताकृती सहा फूट उंच व्यासपीठावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. हे व्यासपीठ उभारण्यासाठी जवळपास 40 वर्षांचा कालावधी लागला होता.

The Ramappa Temple in Telangana, built of floating bricks, is a World Heritage Site

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात