तेलंगणा सरकारच्या मग्रुरीचा शेतकऱ्यांचा फटका, पंतप्रधान पिक विमा योजनेतून बाहेर पडल्याने पाच लाख हेक्टरवरील नुकसानीची भरपाई मिळणार नाही


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद: तेलंगणा राज्यात मुसळधार पावसामुळे सुमारे पाच लाख एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, तेलंगणा सरकारने मग्रुरी दाखवित मे महिन्यात पंतप्रधान पिक विमा योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:चीही विमा योजना लागू केली नाही. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. अशी माहिती कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार देण्यात आली आहे.Telangana govt’s arrogance hits farmers, pulls out from PM insurance scheme and not appointed other company

तेलंगणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषि विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. कारण मे महिन्यात तेलंगणा सरकारने केंद्राच्या पंतप्रधान पिक विमा योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारने स्वत:ची विमा योजने आणणे शक्य होते. परंतु, सरकारने कोणतीही व्यवस्था केली नाही.



अजूनही तेलंगणा सरकारने जर पिकांच्या नुकसानीचा प्रत्यक्ष जमीनीवरील सविस्तर अहवाल तयार केला तर केंद्र सरकारकडून हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळू शकते. परंतु, या संदर्भात राज्य सरकारकडून कोणत्याही सूचना आल्या नसल्याने हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले नसल्याचे कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकसानीचे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करण्यासाठी राज्य सरकारकडून सूचना यायाला हव्यात असे कृषि विभागाचे म्हणणे आहे.

प्राथमिक अंदाजानुसार केंद्राकडून कोणत्याही भरपाईचा दावा करता येणार नाही. संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व महसूल अधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीचा प्राथमिक अंदाजाप्रमाणे अहवाल राज्य सरकारला सादर केला तरी त्याचे कोणताही उपयोग होणार नाही. शेतीचे प्रत्यक्ष नुकसान किती झाले याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करावा लागणार आहे. त्यासाठी प्रचंड मनुष्यबळ आणि मेहनत आवश्यक आहे.

पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच तेलंगणात चांगला पाऊस पडत असल्याने शेतकºयांनी खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत. राज्यात खरीपातील साधारण लागवड क्षेत्र १.१16 कोटी एकर आहे. २२ जुलैपर्यंत ८२,४९ लाख एकर क्षेत्रावर म्हणजे ७० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, डाळी, भुईमूग, सोयाबीन, कापूस यांची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे विशेषत: उत्तर तेलंगणा जिल्ह्यातील संयुक्त अदिलाबाद, निजामाबाद, वारंगल आणि करीमनगर जिल्ह्यात या सर्व पिकांचे नुकसान झाले. कापूस, डाळी आणि धान यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. सरकारने धानापेक्षा जास्त प्रमाणात या खरीप आणि कपाशीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले.

तेलंगणाच्या शेजारील राज्य असलेल्या आंध्र प्रदेशानेही पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग घेतलेला नाही. मात्र, आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी सरकारने स्वत:ची विमा योजना आणली आहे. त्यातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

Telangana govt’s arrogance hits farmers, pulls out from PM insurance scheme and not appointed other company

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात