वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यात एका हिसंक घटनेत मंगळवारी काही घरे पेटवून देण्यात आली. यात आठ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे. पंतप्रधानांनी ट्विटवर म्हटले आहे, हे अघोरी कृत्य करणाऱ्यांना पश्चिम बंगालची जनता कधीच माफ करणार नाही.The Prime Minister’s reaction to the incident in Birbhum district, the people will never forgive the perpetrators
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातीत बोगतू गावात सोमवारी तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते भडू शेख यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर रामपूरहट येथे संतापलेल्या हिंसक जमावाने आठ घरे पेटवून दिली. या घटनेत आठ व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला. या हिंसेमुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तसेच या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटू लागले असून या प्रकरणी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे.
या प्रकरणाची दखल स्वत: पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. ते ट्वीट मध्ये असे म्हणातात, हे अघोरी कृत्य करणाºयांना पश्चिम बंगाची जनता कधीही माफ करणार नाही. या घटनेबद्दल दुख: व्यक्त करत ते म्हणाले मला आशा आहे की बंगालच्या महान भूमीवर असे घृणास्पद पाप करणाऱ्यांना राज्य सरकार नक्कीच शिक्षा देईल आणि मी बंगालच्या जनतेलाही विनंती करतो की, अशा घटना घडवणाऱ्यांना अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाºयांना कधीही माफ करू नका.
या घटनेची दखल कोलकाता उच्च न्यायालयाने घेतली आहे. याबाबत न्यायालयाने एक जनहित याचिका दाखल करुन घेत याबाबत बुधवारी सुनावणी घेतली. यावेळी सुनावणीत न्यायालयाने सरकारवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. बुधवारी दुपारी २ वाजता झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारकडून गुरुवार पर्यंतचा स्टेटस रिपोर्ट मागितला आहे. शिवाय साक्षीदारांच्या संरक्षणासह घटनास्थळाची २४ तास पाळत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App