उड्डाण केल्यावर विमानात वटवाघुळ आढळल्याने केले पुन्हा लॅँडींग

कोरोनाचा उगम वटवाघुळामधून झाल्याचे म्हटले जाते. त्यामुळे वटवाघुळाबाबत धास्तीचे वातावरण आहे. याच धास्तीतून विमानाने उड्डाण केल्यावर वटवाघुळ दिसल्याने पुन्हा लॅँडींग करण्याचा प्रकार दिल्लीहून न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या प्रकारात घडला.The plane made a re-landing due to bat


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाचा उगम वटवाघुळामधून झाल्याचे म्हटले जाते. त्यामुळे वटवाघुळाबाबत धास्तीचे वातावरण आहे. याच धास्तीतून विमानाने उड्डाण केल्यावर वटवाघुळ दिसल्याने पुन्हा लॅँडींग करण्याचा प्रकार दिल्लीहून न्यूयॉर्ककडे जाणाºया प्रकारात घडला.

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर ही अजब घटना घडली आहे. विमानाने गुरवारी सकाळी 2 वाजून 20 मिनिटांनी उड्डान घेतले होते. 30 मिनिटानंतर विमानात वटवाघूळ असल्याचे आढळल्यानंतर विमानाची दिल्लीत सकाळी 3:55 वाजता लँडिंग करण्यात आली.



दिल्ली विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कच्या दिशेने उड्डाण केले. उड्डाण घेतल्याच्या 30 मिनीटानंतर कर्मचाऱ्यांना विमानात वटवाघूळ आढळली. यावर वैमानिकाने परत दिल्लीकडे विमान वळवण्याचा निर्णय घेतला.

विमानासाठी आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली आणि विमानाचे लँडिंग करण्यात आले.वन्यप्राणी विभागाच्या कर्मचाऱ्यां ना वटवाघूळ पकडण्यासाठी बोलवण्यात आले.

विमानात धूर केल्यानंतर मृत वटवाघूळ विमानातील बिझनेस क्लासमध्ये आढळले. सविस्तर तपासणीसाठी या घटनेची माहिती विमान कंपनीच्या उड्डाण सुरक्षा विभागाला देण्यात आली.

प्रवाशांना दुसऱ्या विमानात हलविण्यात आले आणि एअर इंडियाचे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.35 वाजता न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले.

The plane made a re-landing due to bat

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात