Hanuman Jayanti Advisory : रामनवमीला घडलेल्या हिंसाचारानंतर आता गृहमंत्रालय अधिक सतर्क, हनुमान जयंतीनिमित्त राज्य सरकारांना विशेष सूचना!


कोलकाता उच्च न्यायालयानेही हनुमान जयंतीबाबत पश्चिम बंगाल सरकारला आदेश दिला आहे.

 विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने हनुमान जयंतीच्या तयारीबाबत सर्व राज्यांना अडव्हाझरी जारी केली आहे. या अंतर्गत, राज्य सरकारांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे, सण शांततेत साजरा करणे आणि समाजातील जातीय सलोखा बिघडवणाऱ्या कोणत्याही घटकावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे. The MHA has issued an advisory to all states in preparation for Hanuman Jayanti

रामनवमीच्या दिवशी बिहार आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाल्यामुळे केंद्र सरकार आधीच अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे सर्व राज्यांना या उत्सवादरम्यान कडक दक्षता घेण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. यावेळी केंद्राकडून कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही.

पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये हिंसाचार –

रामनवमीपासून सुरू झालेला जातीय हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. त्याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम बंगालमधील हुगळीत दिसून आला. आताही पश्चिम बंगाल आणि बिहारच्या शहरांमध्ये हिंसाचाराची आग पुन्हा पुन्हा पेटत आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश

दुसरीकडे, कोलकाता उच्च न्यायालयानेही बुधवारी (५ एप्रिल) हनुमान जयंतीबाबत आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाने बंगाल सरकारला केंद्र सरकारकडून अतिरिक्त फौजफाटा मागण्यास सांगितले. राज्यात पोलिसांची संख्या पुरेशी नसेल तर तुम्ही निमलष्करी दलाची मदत घेऊ शकता. शेवटी, आम्हाला आमच्या नागरिकांची सुरक्षा हवी आहे. असं न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्लीत जयंतीपूर्वी फ्लॅग मार्च –

त्याचवेळी दिल्लीत हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरीमध्ये फ्लॅग मार्च काढला. तर ६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीला जहांगीरपुरी परिसरात मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि अन्य गटाला परवानगी नाकारली आहे.

The MHA has issued an advisory to all states in preparation for Hanuman Jayanti

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात