वीर सावरकरांच्या प्रखर हिंदुत्वावरच सरकार चालणार!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका  


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार हे प्रखर हिंदुत्वावर चालावे, अशी आमची आग्रही भूमिका असणार आहे आणि म्हणूनच मी इथे वीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आलो आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. The government will run on the strong Hindutva of Veer Savarkar

आधीच्या सरकारमध्ये सावरकरांवर आक्षेपार्ह विधान होत होती. त्याला उत्तरे देता येत नव्हती आमची सगळ्यांची गळचेपी होत होती. तो विरोध बाजूला साधूनच नवीन सरकार स्थापन केले आहे, असे ते म्हणाले.

आमचेही हिंदुत्व वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचेच!!  

शिंदे गट आणि  भाजपा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे वीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मंगळवारी, ५ जुलै रोजी आले होते, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे हिंदुत्व आहे, तेच आमचेही हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व म्हणचे कोणत्या इतर धर्माचे तिरस्कार करणारे नाही. परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे सरकार स्थापन झाल्यानंतर या राज्याचा विकास, जो सर्वसामान्यांचा, सर्व घटकांना न्याय देणारा असेल, असेही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

– कायदा – सुव्यवस्था राखण्याला प्रथम प्राधान्य 

प्रत्येक घटकाला हे सरकार त्यांचे सरकार आहे, असे वाटले पाहिजे, त्यादृष्टीने हे सरकार काम करेल. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आमचे प्रथम प्राधान्य असणार आहे, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

The government will run on the strong Hindutva of Veer Savarkar

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात