केंद्राची कोविड सुरक्षा मोहीम; कोवॅक्सिन लसीचे उत्पादन ४ महिन्यांमध्ये ७ पट करण्याचे नियोजन; विज्ञान – तंत्रज्ञान मंत्रालयाचा निर्धार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – देशात कोरोना विरोधातील लढाई निकराला आली असताना ऑक्सिजनपासून लसीकरणापर्यंत सर्व उपाययोजनांना अभूतपूर्व वेग देण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या कोविड सुरक्षा मोहिमेअंतर्गत त्याचवेळी कोवॅक्सिन लसीचे उत्पादन येत्या ४ महिन्यांमध्ये म्हणजे ऑगस्टपर्यंत तब्बल ७ पट वाढविण्याचा निर्धार केंद्रीय माहिती – तंत्रज्ञान मंत्रालयाने केला आहे. The current production capacity of Covaxin vaccine will be doubled by May-June 2021 and then increased nearly 6-7 fold by July-Aug 2021

सध्या कोवॅक्सिन लसीचे उत्पादन युध्दपातळीवर सुरू आहे. १२ वर्षांखालील मुलांना लस देण्यासाठी तिच्या चाचण्याही सुरू आहेत. भारत बायोटेकच्या बेंगळुरूमधील उत्पादन केंद्रासाठी केंद्र सरकारकडून ६५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

सध्या कोवॅक्सिनचे उत्पादन युध्द पातळीवर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मे अखेरीस ते जूनच्या मध्यापर्यंत हे उत्पादन दुप्पट करण्यात येईल. तसेच जुलै – ऑगस्ट दरम्यान ते ७ पटींपर्यंत वाढविण्यात येईल. सप्टेंबर २०२१ अखेरीस दर महिन्याला १० कोटी डोसच्या निर्मितीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. माहिती – तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

हाफकिन इन्स्टिट्यूट तसेच इंडियन इम्युनुलॉजिकल लिमिटेड या दोन्ही कंपन्यांना देखील लस उत्पादनासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

The current production capacity of Covaxin vaccine will be doubled by May-June 2021 and then increased nearly 6-7 fold by July-Aug 2021

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात