विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वृत्तपत्रे पूर्वी घोटाळे बाहेर काढत. मात्र, आता अशा प्रकारच्या बातम्या क्वचितच दिसतात. भारतीय माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता ही संकल्पना लोप पावत चालली आहे, अशी खंत भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी व्यक्त केली.The concept of investigative journalism is disappearing in the Indian media, says Chief Justice N.V. Ramana
रमणा म्हणाले, सध्याच्या माध्यमांबद्दल बोलण्याचे स्वातंत्र्य मी घेत आहे. दुर्दैवाने म्हणावे लागत आहे की सध्याच्या माध्यमांच्या अवकाशातून शोध पत्रकारिता लोप पावत चालली आहे. मी बालपणापासून पाहतोय की पूर्वी मोठमोठ्या घोटाळ्यांचा पर्दाफाश वृत्तपत्रांतून व्हायचा.
लोक वृत्तपत्रांची वाट पाहायचे. अनेक घोटाळे आणि गैरव्यवहाराच्या बातम्या वृत्तपत्रांनी उघडकीस आणल्या. त्याचे चांगले परिणामही झाले. मात्र, गेल्या काही वर्षांत मला अपवाद वगळता अशी बातमी आठवत नाही. व्यक्ती आणि संस्थांचे सामूहिक अपयश प्रसारमाध्यमांनी अधोरेखित केले पाहिजे. माध्यमांनी लोकांना यंत्रणेतील कमतरतांची जाणीव करून देण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App