नितीन गडकरी यांचे मंत्रालय करणार जागतिक विक्रम


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय एका जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे. हे मंत्रालय सध्या दररोज 38 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करीत आहे. लवकरच हे प्रमाण 40 किलोमीटर होणार आहे. त्यावेळी हा जागतिक विक्रम असेल अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.Nitin Gadkari’s ministry will set a world record

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात गडकरी म्हणाले की, माझे मंत्रालय सध्या दररोज 38 किलोमीटर लांबीच्या महामार्गाची निर्मिती करत आहे. मात्र आम्हाला 40 किमीपर्यंत जायचे आहे. तसे झाले तर तो एक जागतिक विक्रम ठरेल. मात्र, यावरही आम्ही समाधान मानणार नाही. दररोज 45 किलोमीटरपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न राहील.



गडकरी म्हणाले, 2014 मध्ये आमचे सरकार सत्तेत आले तेव्हा रस्ते आणि राष्ट्रीय महागार्चे 406 प्रकल्प प्रलंबित होते. या सर्व प्रलंबित प्रकल्पांची किंमत 3 लाख 85 हजार कोटी होती. भूमी अधिग्रहण, आर्थिक तरतूद तसेच अन्य कारणांमुळे हे प्रकल्प रखडले होते.

आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर या सर्व प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेऊन ते कार्यान्वित केले. यामुळे बँकांचे 3 लाख कोटी रुपये बुडित खात्यात जाण्यापासून वाचले. 2014 मध्ये देशात राष्ट्रीय महामार्गांची लांबी 91,287 किमी होती, ती आता 1 लाख 40 हजार 937 किमी झाली आहे.

रस्ते बांधकामाच्या क्षेत्रात भारत आज जगात पहिल्या स्थानावर आहे. रस्ते बांधकामाच्या क्षेत्रात आमच्या मंत्रालयाने काही विश्वविक्रम केले. पहिला म्हणजे मुंबई दिल्ली एक्स्प्रेसवेवर 2.5 किमी लांबीचा 4 पदरी रस्ता 24 तासात तयार करण्यात आला. त्याचप्रमाणे सोलापूर बिजापूर हा रस्ताही विक्रमी वेळात बांधण्यात आला, असेही गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari’s ministry will set a world record

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात