कम्युनिस्टांसह तृणमूल आणि कॉँग्रेसचे आव्हानही काढले मोडीत, त्रिपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला ३३४ पैकी ११२ जागा बिनविरोध


विशेष प्रतिनिधी

आगरतळा: तृणमूल कॉँग्रेसकडून आव्हान उभे करण्याच्या वल्गना फोल ठरवित आणि कम्युनिस्ट आणि कॉँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षाने त्रिपुरात मोठे यश मिळविले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ३३४ पैकी ११२ जागा भाजपाने बिनविरोध पटकावल्या आहेत.The BJP has won 112 out of 334 seats in the local body elections in Tripura unopposed, The Trinamool and the Congress, along with the Communists got big setback

सोमवार उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज पडताळणीची तारीख ५ नोव्हेंबरआहे. आता उर्वरीत २२२ जागांसाठी एकूण ७८५ उमेदवार मैदानात असून, यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.



विरोधी पक्ष माकपाचे १५, तृणमूल काँग्रेसचे ४, काँग्रेस ८, एफआयएफबी दोन आणि सात अपक्ष उमेदवारांसह ३६ उमेदवारांनी सोमवारी आपली उमेदवारी मागे घेतली होत. आगरताळा नगरपालिकेतील ५१ वॉर्ड, १३ नगरपरिषदा आणि ६ नगर पंचयातींसह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण ३३४ जागा आहेत.

भाजपद्वारे आश्रय देण्यात आलेल्या गुंडांकडून निर्माण केल्या जात असलेल्या दहशतीमुळे त्यांच्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायल भाग पाडले गेले, असा आरोप माकपाचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनी केला. आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला व पाच नगरपरिषदा आणि दोन नगर पंचायतीमध्ये आमचे उमेदवार आपले अर्ज दाखल करू नाही शकले. भाजपच्या गुंडांना मोठी दहशत पसरवली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे

सात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अंबासा नगर परिषद, जिरानिया नगर पंचायत, मोहनपुर नगरपरिषद, राणीबाजार नगर परिषद, विशालगड नगरपरिषद, उदयपूर नगरपरिषद आणि संतरिबाजार नगरपरिषदेत कोणताही अपक्ष उमेदवार नाही.

The BJP has won 112 out of 334 seats in the local body elections in Tripura unopposed, The Trinamool and the Congress, along with the Communists got big setback

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात