स्वदेशी बनावटीची युद्धनौका विक्रांत चाचण्यांसाठी पुन्हा खोल समुद्रात रवाना


विशेष प्रतिनिधी

मुंबई – भारताची युद्धनौका विक्रांत पुन्हा समुद्री चाचण्यांसाठी रवाना झाली आहे. ही नवी चाळीस हजार टन स्वदेशी बनावटीची विक्रांत युद्धनौका भारतात उभारली जात आहे.
यापूर्वी निवृत्त झालेल्या भारताच्या विक्रांत आणि विराट या युद्धनौका ब्रिटिश नौदलाकडून घेतल्या होत्या;Test of vIkarant started in deep sea

तर सध्या वापरात असलेली आयएनएस विक्रमादित्य ही युद्धनौका रशियाकडून घेतली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात विक्रांतची पहिली समुद्री चाचणी झाली होती. त्यावेळी तिचे इंजिन, दिशादर्शक यंत्रणा व विमानांचे उड्डाण तसेच अन्य साध्या चाचण्या घेण्यात आल्या.ऑक्टोबरमधील दुसऱ्या चाचणीदरम्यान तिच्यावरून कठीण विमानोड्डाणे झाली, तसेच विमाने उतरविण्यात आली. त्यावेळी ही युद्धनौका दहा दिवस समुद्रात होती. भरसमुद्रात तिची कामगिरी कशी आहे हेदेखील पाहण्यात आले.

ही कामगिरी समाधानकारक वाटल्याने आता समुद्राच्या वेगवेगळ्या अवस्थेत आणि वेगवेगळ्या वातावरणात ही युद्धनौका कशी काम करते, हे तपासले जाईल. त्याचप्रमाणे शत्रूच्या युद्धनौका आणि विमाने, क्षेपणास्त्रे आधीच ओळखणाऱ्या सेन्सरची परिणामकारकताही आजमावली जाणार आहे.

Test of vIkarant started in deep sea

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था